नेर (fasting to death) : नेर तालूक्यातील आंजती पारधी वसाहतीतील घरकूलासाठी १२ आगष्ट पासुन (Pardhi Samaj) पारधी बांधव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषनाला बसले आहे. आंजती बेड्यावर ५६ कूंटूब गत २० वर्षापासुन वास्तव्यास आहे.मात्र झोपड्यात राहणाऱ्या या कूंटूबाला कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ नाही. अनेक वर्षापासून हा जमाव घरकूलाची मागणी करीत आहे. २५ जानेवारीला या मगणीसाठी पारधी बांधव उपोषनाला बसले होते.मात्र यावेळी ३० जानेवारी पर्यत तूम्हाला कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.
आंजती ग्रामपंचायत ठराव देईल हेही आश्वासन त्या वेळी देण्यात आले. मात्र कोणत्याही बाबीची पूर्तता झाली नाही.व ३० जानेवारीला ग्रामसभेत वाद झाला. स्वातंत्र्य मिळवुन ७८ वर्ष झाली तरी आम्ही पारतंत्र्यांत आहो. यामूळे या ५६ कूंटूबीयांनी आज पासून आमरण उपोषन (fasting to death) सूरु केले आहे.तथा जो पर्यत कायमस्वरूपी घरकूल देण्यात येणार नाही. तो पर्यत हे उपोषन सूरूच राहील असा ईशारा या निवेदनात बबन मंग्या पवार साजेरी पवार आरूषा पवार यांनी देऊन उपोषनाला सूरवात केली आहे.