वर्ग 5 ते 7 वर्गाची पालक सभा आयोजित!
रिसोड (Parents Meeting) : आज दिनांक 4 ऑक्टोबर शनिवारला भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रिसोड येथे वर्ग 5 ते 7 वर्गाची पालक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे प्राचार्य श्री भांडेकर सर तर प्रमुख उपस्थिती मध्ये शाळेचे पर्येंवेक्षक श्री थोरात सर, विशेष वर्ग प्रमुख श्री दिपक सरोदे सर, पालक प्रतिनिधी म्हणून श्री मगर सर मंचावर उपस्थित होते.
शिक्षक, शिक्षिका तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित!
शाळेचे पर्येंवेक्षक श्री थोरात सर यांनी शाळेत घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती सांगितली. काही पालकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून शाळेचे प्राचार्य श्री भांडेकर सर यांनी पालक सभेचे शिक्षण प्रक्रियेत असणारे महत्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या (Students) प्रगतीत शाळेबरोबर पालकांचे योगदान यावर प्रकाश टाकला, तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासात येत असलेल्या विविध अडचणी व त्यावरील उपाय याविषयीं मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक (Teachers), शिक्षिका तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ. बबेरवाल मॅडम यांनी केले.




