परभणी(Parbhani) :- शहर वाहतूक शाखेचे(Transport Branch) पथक बुधवार ४ सप्टेंबर रोजी शहरामध्ये गस्त घालत होते. यावेळी विजय तुकाराम तांबे हा त्यांच्या जवळ आला. त्याने रेल्वे गेट क्रमांक दोन जवळ एक पाच वर्षाचा मुलगा सापडल्याचे सांगितले. यानंतर शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी सदर पालकांचा शोध घेत बिलाला सुखरुप पालकांकडे स्वाधीन केले.
शहर वाहतूक शाखेची कामगिरी
सदर मुलाला त्याचे नाव विचारले असता त्याला नाव सांगता आले नाही. शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मुलाच्या बेपत्ता होण्याविषयी तक्रार आहे का, याची चौकशी करण्यात आली. मात्र कोणत्याही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार(complaint) दाखल नव्हती. त्यानंतर पोलिसांनी सुनील तांबे, सय्यद शकिल सय्यद खलील यांना सोबत घेवून मुलाला पायी चालविले. त्याच्या मागे- मागे पोलिसही गेले. साखला प्लॉट भागातील ज्ञानेश्वर नगर भागात गेल्यावर मुलाला त्याचे घर लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी सर्व चौकशी करुन मुलाला पालकांच्या स्वाधीन केले. या प्रसंगी शहर वाहतूक शाखेचे सपोनि. वामन बेले, पोउपनि. मकसुद पठाण, पोलीस अंमलदार देशमुख यांची उपस्थिती होती. मुलगा सुखरुप पालकांच्या स्वाधीन करण्यात आला.