देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर () : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. त्यामध्ये दरवर्षी जिल्ह्यात आरटीईतून हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात. यंदा (RTE application) आरटीईकरिता शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून त्यानुसार जिल्ह्याचा विद्यार्थी प्रवेशाचा कोटा (जागा राखीव) निश्चित झाला आहे. त्यानंतर मंगळवार १४ जानेवारीपासून आरटीईसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून २७ जानेवारीपर्यंत पालकांना अर्ज करता येणार आहे.
त्यामुळे अर्ज प्रक्रीयेसाठी (RTE application) लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास पालकांची धावपळ वाढल्याचे दिसून येत आहे. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत आर्थिक व दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के आरक्षित जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. दरवर्षी या प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यातून हजारो पालक अर्ज करत असतात. गतवर्षी पूर्वीच ही संपूर्ण (RTE application) आरटीईची प्रक्रियाच विलंबाने सुरू झाली होती. आणि त्यातही सुरूवातीला या प्रक्रियेमध्ये अनुदानित व शासकीय शाळांचाही समावेश केल्याने पालकांनी न्यायालयाचे दार ठोठाविले होते.
त्यानंतर (RTE application) आरटीईतून शासकीय आणि अनुदानित शाळा वगळण्यात आल्या होत्या. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचंड विलंब झाल्याने गतवर्षी अपेक्षेच्या तुलनेत अर्जही सादर झाले नव्हते, तसेच प्रवेशही कमी झाले होते. परंतु यंदा नोंदणीमध्ये पूर्वीपासूनच शासकीय आणि अनुदानित शाळांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात खासगी शाळांच्या नोंदणीचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वर्ष २०२५-२६ करिता जिल्ह्यात ६४६ शाळांनी नोंदणी केली असून, जिल्ह्यासाठी आरटीईअंतर्गत ७००५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आता शाळांची नोंदणी प्रक्रीया पार पडल्यानंतर बालकांची अर्ज प्रक्रिया मंगळवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात पालकांची चांगलीच दमछाक होत आहे.
आजपासून होणार अर्ज प्रक्रियेला सुरूवात?
कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू प्रवेश प्रक्रीयेत निवासी पुराव्याकरिता आता कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरल्या जाते. तसेच रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स पावती, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी पैकी कोणताही एक पुरावा. नोंदणीकृत भाडेकरार द्यावयाचा असल्यास हा करार ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा व त्याचा कालावधी १ वर्षाचा असावा. गॅस बुक, इतर स्थानिक बँकेचे तसेच पतसंस्थेचे पासबुक निवासी पुरावाकरीता ग्राह्य धरण्यात येतात. सध्या (RTE application) प्रवेश प्रक्रीया अद्याप सुरू झाली नसताना पालकांकडून आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.