पॅरिस/नवी दिल्ली (Swapnil Kusale Paris Olympics) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये (Paris Olympics 2024) भारताची तिसऱ्या पदकाची प्रतीक्षा संपली आहे. स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) याने आज गुरुवारी पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत कांस्यपदक (Wins Bronze) पटकावले. ऑलिम्पिकमधील 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत भारतीय नेमबाजाने पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वप्नीलने एकूण 451.4 गुण मिळवले. (Swapnil Kusale) स्वप्नील कुसळेने पात्रता फेरीत 590-38 गुण मिळवून 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते.
पॅरिसमध्ये सुरू असलेले ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) उत्सव प्रत्येक नवीन दिवसासह अधिक रोमांचक होत आहेत. 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला आणखी एक पदक जिंकण्याची संधी आहे. आज सहाव्या दिवशी भारतीय खेळाडू ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, नेमबाजी, तिरंदाजी, बॉक्सिंग अशा अनेक खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.
ऑलिम्पिक (Paris Olympics 2024) जिंकल्यानंतर स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) यांनी त्याचा आनंद व्यक्त केला. त्याच्या विजयानंतर जिओसिनेमाशी बोलताना स्वप्नील कुसळे म्हणाले की, माझे हृदय आजही या स्पर्धेदरम्यान जेवढे धडधडत होते, तितकेच आताही धडधडत आहे. खूप दडपण जाणवले, पण मला आनंद आहे की, मी माझ्या देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्यास मी शेवटी सक्षम आहे!”
Absolutely thrilled for Swapnil’s epic bronze medal win in shooting at the Paris Olympics! 🥉 Your hard work, grit, and passion have truly paid off. Competing at the highest level and coming away with a medal in shooting is a testament to your dedication and talent. You’ve made… pic.twitter.com/7jxchc5WCX
— Abhinav A. Bindra OLY (@Abhinav_Bindra) August 1, 2024