मानोरा (Washim) :- अंशतः अनुदानित शाळांना १ जानेवारी २०२४ पासून वाढीव टप्पा अनुदान द्यावे, या बाबत तात्काळ जी. आर. काढावा, त्रुटी पूर्ण केलेल्या सर्व तुकड्या, शाळांना (School)समान वाढीव टप्पा अनुदान द्यावे, पुणे स्तरावर अघोषित शाळांना घोषित करून अनुदान द्यावे, जूनी पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्यासाठी अंशतः अनुदानित शिक्षकांनी राज्यभर तालुका, जिल्हा, विभाग स्तरावर विविध प्रकारचे आंदोलन सुरू केले आहे.
हे आंदोलन सोमवार दिनांक ५ ऑगस्ट पासून तीव्र करण्यात आले आहे
अमरावती विभागात हे आंदोलन सोमवार दिनांक ५ ऑगस्ट पासून तीव्र करण्यात आले आहे. सोमवारी दिनांक ५ ऑगस्ट रोजी सर्व तालुका ठिकाणी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. दिनांक ६ ऑगस्ट पासून वाशीम येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात विविध शिक्षकसंघटना(Teachers Union), मुख्याध्यापक संघ, शिक्षक समन्वयक संघाचे पदाधिकारी यांचे सह कायम विना अनुदानित शाळा कृती समितीचे विभागीय संघटक उपेंद्र पाटील, स्वराज्य शिक्षक संघाचे जी.एस.बोरकर,जगदीश गोरे, शरद मोरे, प्रवीण जांभरूनकर , रुपेश सोनोने, पवन राठोड, परमेश्वर कोंगे, बाळू वाघमारे, गणेश राठोड, माणिक डेरे, संतोष गावंडे, पवन काळे, विजय देशमुख, दिगंबर गुळधे, रवी मुठाळ, नीलेश उजवे, निरंजन उपाध्ये, विकलसिंग राठोड, मनीष सुर्वे, पवन कव्हर, दीपक गोटे,प्रकाश लोणकर,निखिल गावंडे, गोपाल शेवाळे, प्रवीण ठाकरे, गोवर्धन उंडाल, कैलास आढाव, अरुण लुंगे, रवी नप्ते गोपाल मोरे, अंकुश शेंडोकार, काशिराम लांडगे, संतोष जाधव, मिलिंद मनवर, नितीन मनवर आदी उपस्थित होते. या वेळी जिल्हाधिकारी, उप शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.