परभणी (Parbhani Bus) : पुर्णा तालुक्यातील (Purna taluka) सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या ताडकळस येथे प्रवाशांना थांबण्यासाठी (parbhani Bus) मुख्य बसस्थानक परिसरात साधे पत्राचे शेडही नसल्याने वृध्द , विद्यार्थी, दिव्यांग प्रवाश्यांसह व्यापारी, अधिकारी व कर्मचार्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून ताडकळस येथे बसस्थानक (bus station) करण्याची मागणी प्रवाश्यांतुन करण्यात येत आहे.
ताडकळस येथे बसस्थानका अभावी प्रवाशांची गैरसोय
ताडकळस येथील बाजारपेठ पुर्णा तालुक्यात (Purna taluka) सर्वात माेठी बाजारपेठ आहे. ताडकळस-पालम-लोहा-कंधार, ताडकळस-पालम- गंगाखेड, ताडकळस-परभणी, ताडकळस- पुर्णा-नांदेड ही चार प्रमुख राज्य महामार्ग आहेत. सध्या या चारही रस्त्याचे चौपदरीकरणांसह डांबरीकरण झाले आहे. तसेच राज्य शासनाने ७५ वर्षाच्या वृध्दांना मोफत बसप्रवास असुन अपंग, ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना कमी दरात प्रवास असतो. विशेष म्हणजे या परिसरात श्रीक्षेत्र फळा, त्रिधारा, दस्तापुर याबरोबरच औंढा नागनाथ, श्री वैजनाथ परळी, अहमदपूर, पाेखर्णी नृसिंह हे माेठे तिर्थक्षेत्र आहे. याठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.
ये -जा करणांऱ्या प्रवाशांची संख्या वाढली
तसेच पाथरी येथे श्रीसाईबाबा जन्मस्थान (Sri Sai Baba) असुन कंधार येथे हाजीसय्या, परभणी येथे तुरुतपीर येथील दर्ग्याला जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे.या सर्व प्रवाशांना (bus station) बसस्थानकाअभावी भर उन्हात बसची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून महिलांना बस प्रवासात ५०टक्के तिकिटात सुट दिली आहे. तसेच विद्यार्थी , वृध्द , दिव्यांगांना देखील सुट असल्याने या ठिकाणीहुन ये -जा करणांऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. या सर्व गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींसह राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देवुन तात्काळ ताडकळस येथील मुख्य बसस्थानक (parbhani Bus) परिसरात बसस्थानक उभारण्यात यावे अशी मागणी प्रवाश्यांतुन होत आहे.