प्रवाशांनो कृपया लक्ष द्या;सचखंड एक्स्प्रेस रविवारी ९ तास उशिरा..!
परभणी(Parbhani):- उत्तर भारतात सुरु असलेल्या किसान आंदोलनामुळे(Peasant movement) दक्षिण भारतातील रेल्वे सेवा कोलमडली आहे. नांदेड (Nanded) येथुन अमृतसर येथे दैनंदिन धावणारी रविवारी २८ रोजी नांदेड रेल्वे(Nanded Railway) स्थानकावरून तब्बल ९ तास उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली आहे.
नांदेड-अमृतसर-नांदेड (सचखंड सुपरफास्ट एक्स्प्रेस) नांदेड येथून अमृतसर करिता दैनंदिन धावते. मागील काही दिवसांपासून उत्तरे कडील राज्यात किसान आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ठिक ठिकाणी रेल्वे अडवल्या जात आहे. त्यामुळे उत्तरभारतातुन दक्षिणेकडे धावणा-या रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. याचा फटका पंजाब राज्यातील भावीकांना बसत आहे. परिणामी नांदेड येथून २८ एप्रिल रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२७१५ सचखंड एक्सप्रेस तिची नियमित वेळ सकाळी ९:३० वाजता सुटण्या ऐवजी ही गाडी सायं ६ वाजता सुटणार आहे. अशी माहिती नांदेड रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने (Public Relations Department) दिली आहे.