परभणीच्या सिंगणापूर फाटा आमडापूर रस्त्यावरील घटना दैठणा पोलीसात नोंद
परभणी/पाथरी (Pathari Accident) : अॅटोवरील ताबा सुटून अॅटो रस्त्याखाली जाऊन पलटी झाला. या अपघातात अॅटो चालकाचा मृत्यू झाला. ही घटना १७ फेब्रुवारी रोजी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास सिंगणापूर फाटा ते आमडापुर जाणार्या रस्त्यावर घडली. सदर प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत सोपान वाघमारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे दाजी दिलीप दत्ता कांबळे वय ३० वर्ष हे अॅटो चालवितात.
१७ फेब्रुवारीच्या रात्री दिलीप कांबळे हे एम.एच.२२ ए.पी.४०४९ हा अॅटो चालवत होते. सिंगणापूर ते आमडापूर फाट्या दरम्यान दिलीप कांबळे यांचा अॅटोवरील ताबा सुटला. अॅटो रस्त्याखाली जाऊन अपघात झाला. या (Pathari Accident) अपघातामध्ये दिलीप कांबळे यांचा मृत्यू झाला. स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.