सिमुरगव्हाण वस्ती जवळील घटना
पाथरी (Pathari Accident) : तालुक्यातील सिमुरगव्हाण वस्ती जवळ झालेल्या (Pathari Accident)अपघातामध्ये एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची गुरुवारी सकाळी घटना घडली आहे. अपघाता विषयी मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार ३० मे रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सिमुरगव्हाण येथील सुरेश राजगुरे हे दुचाकीवरून पाथरीकडे जात होते. राष्ट्रीय महामार्ग ५४८ ब वर सिमुरगव्हाण वस्ती जवळ येताच त्यांना सेलूच्या दिशेने जाणाऱ्या एमएच १४ सीएक्स ८५०६ ने समोरासमोर धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमीला (Parbhani Hospital) उपचारासाठी परभणी येथे नेण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग 548 ब वरील घटना
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक५४८ ब चे पाथरी पासून सिमुरगव्हाण वस्ती पर्यंत ७ किमी सिमेंट काँक्रिटीकरण चे काम करणाऱ्या सरस्वती कन्स्ट्रक्शन कंपनीने वस्ती समोर १०० मीटर परिसरात अनावश्यक खोदून ठेवले आहे. (Pathari Crime) पाथरी कडून येणाऱ्या वाहन चालकांना रस्ता संपत असल्याचे लक्षात येत नसल्याने वाहने वेगाने काम न झालेल्या रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय रस्ता संपण्यापूर्वी गतिरोधक बसविण्याची गरज असताना तसे करण्यात न आल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. दोन दिवसापुर्वी याच (National Highway Accident) रस्त्यावर अपघात घडल्यानंतर भितीने पळून जाणारा जखमी दुचाकीस्वार विहीरीत पडल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थांनी वेळीच मदत केल्याने या दुचाकीस्वाराचे प्राण वाचले होते.