पाथरी (Pathari Assembly Election) : परभणीतील पाथरी विधानसभेची निवडणूक प्रक्रिया चालू असून ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज परत घेणे प्रकिर्या सुरवात झाली आहे.यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पाथरी शैलेश लाहोटी,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड हे जातीने त्यांच्या दालनात उपस्थित होते.गुरुवारी दिवाळी सणाचा पहीला दिवस असतानाही (Pathari Assembly Election) निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर हजर होते.तसेच निवडणूक कामासाठी स्थापन केलेले विविध कक्षाचे (नियंत्रण कक्ष,निवडणूक कामकाज कक्ष,एक खिडकी कक्ष,मीडिया सेंटर कक्ष, व्हीं.एस.टी.पथक कक्ष,संगणक कक्ष) कामकाज सुरू होते.
गुरुवारी दिवस अखेर
एकही निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला नाही. (Pathari Assembly Election) अद्याप 47 उमेदवार रिंगणात आहेत दिनांक 1 ते 3 नोव्हेंबर सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज मागे घेता येणार नाहीत . 4 नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजे पर्यंत ची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम वेळ असेल त्या नंतरच 98 पाथरी विधानसभा निवडणूक चे उमेदवार संख्येचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.