इच्छुकांनी ज्वारी हातात घेत घेतली शपथ!
पाथरी (Pathari Assembly Election) : परभणीच्या पाथरी विधानसभा मतदारसंघात मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील म्हणतील तोच उमेदवार निवडणूक लढणार किंवा म्हणतील त्याच उमेदवाराला पाठिंबा द्यायचा अशी एक मुखी शपथ इच्छुकांनी पाथरी येथील बैठकीत घेतले आहे . सोबतच जरांगे पाटील यांच्याकडून पाथरी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे उमेदवार सोमवारी एकीचे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली आहे .
सोमवारी एकत्र शक्ती प्रदर्शन, पाथरी इच्छुकांची बैठक संपन्न
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या (Pathari Assembly Election) विधानसभा निवडणुकीमध्ये प्रभाव असणाऱ्या काही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पाथरी विधानसभा मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांनी आपले परिचय पत्र जरांगे पाटील यांच्याकडे दिले होते . २५ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीमध्ये २६ इच्छुकांपैकी एकाने उमेदवारी द्यावी अशी सूचना जरांगे पाटील यांनी केली होती .त्यानुसार रविवार २७ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पाथरी शहराशेजारील पोहेटाकळी शिवारात एका ठिकाणी २६ इच्छुकांना आमंत्रित करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी बैठकीस २६ पैकी १७ इच्छुक उमेदवार उपस्थित होते .चर्चेनंतर सर्वांनी सोमवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता एकीचे प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरवण्यात आले आहे.
एकाच वेळी उमेदवारी अर्ज दाखल करणार
दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी जरांगे पाटील सांगतील तो उमेदवार निवडणूक (Pathari Assembly Election) मैदानात उभा राहणार असून याव्यतिरिक्त जरांगे पाटलांच्या आदेशाने उमेदवारी किंवा पाठींबा देण्याचा निर्णय झाल्यावरही पाटलांच्या आदेशाचे पालन करण्याची शपथ यावेळी ज्वारी हातात घेऊन घेण्यात आली आहे.
२६ इच्छुकांपैकी १७ इच्छुकांची बैठकीला हजेरी
सदरील बैठकीला माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची व त्यांच्या प्रतिनिधिची अनुपस्थिती राहिली .यावेळी २६ इच्छुकांपैकी बापू कोल्हे , अभिजीत कदम ,अर्जुन पाटील , प्रा . नितीन लोहट ,एडवोकेट बालासाहेब पौळ , डॉ . जगदीश शिंदे , डॉ .राम शिंदे , मंचकराव बचाटे, किरण शिंदे , दादासाहेब टेंगसे , अरुण कोल्हे ,माजी आमदार मीराताई रेंगे यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीनिवास रेंगे , गोविंद घांडगे ,अमोल भिसे , मुंजाभाऊ कोल्हे , नारायण अवचार , डॉ . राजेंद्र कोल्हे यांची उपस्थिती होती.