परभणी/पाथरी (Pathari Assembly Election) : नोव्हेंबर महिन्यात संभाव्य असलेल्या विधानसभा निवडणुकी (Assembly Election) संदर्भात गुरुवारी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.आज शहरातील पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात उपविभागीय अधिकारी तथा पाथरी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली पाथरी विधानसभा क्षेत्रातील नियुक्त सर्व क्षेत्रीय अधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी ,गट विकास अधिकारी,पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार यांची आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीत नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या संभाव्य (Pathari Assembly Election) विधानसभा निवडणूक बाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या .यात मतदान केंद्र स्थिती , उपलब्ध सुविधा बाबतचा अहवाल पुढील दिवसात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुक अनुषगांने १० सप्टेंबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये इव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात मतदार जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे . यासाठी पाथरी उपविभागात २ मोबाईल व्हॅन द्वारे प्रत्येक गावात मतदान केंद्रावर पथक व्हॅनसह जावून मतदारांमध्ये इव्हीएम व व्हिव्हिपॅट संदर्भात मतदार जनजागृती मोहिम हाती घेणार आहे . पाथरी शहरात या जनजागृतीची सुरुवात गुरुवारी उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी (Pathari Assembly Election) पाथरी विधानसभा मतदार संघ शैलेश लाहोटी यांचे हस्ते करण्यात आली . यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात वकील संघाचे पदाधिकारी , शहरातील जेष्ठ नागरीक व युवक यांची उपस्थिती होती.
संभाव्य विधानसभा सार्वत्रिक (Assembly Election) निवडणूकीसाठी पाथरी विधानसभा मतदार ५९ झोनल अधिकारी व ४६ पोलीस क्षेत्रीय अधिकारी व कार्यालयप्रमुख यांचा गुरुवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. उपस्थित अधिकारी यांना क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांनी संयुक्तरीत्या भेट देवून मतदान केंद्रावरील किमान मुलभुत सुविधा ची तपासणी करावी सोबतीच संवेदनशील मतदान केंद्राची तपासणी करुन अहवाल तातडीने सादर करण्यासाठी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी सुचना दिल्या आहेत.
दरम्यान गैरहजर असलेले क्षेत्रीय अधिकारी व पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांच्या विरुध्द कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी यांचेकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी विभागीय अधिकारी यांनी सांगीतले आहे. झालेल्या (Assembly Election) बैठकीस क्षेत्रीय अधिकारी , पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह तहसिलदार पाथरी , पाथरी नपा मुख्याधिकारी , मानवत , पाथरी व मानवत चे पोलीस निरीक्षक उपस्थीत होते.