परभणीतील पाथरी विधानसभा निवडणुक; नामनिर्देशन छाननी
परभणी/पाथरी (Pathari Assembly Elections) : पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक साठी विविध उमेदवारांनी राजकीय पक्ष , अपक्ष म्हणुन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी शेवटच्या वेळेपर्यंत 53 उमेदवारांनी 77 अर्ज दाखल केले होते . बुधवारी तहसील कार्यालय येथे सकाळी 11 वाजता उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी समोर उमेदरवारांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. यात अकरा उमेदवारांचे बारा नामनिर्देशन पत्रे बाद झाली आहेत.
बुधवार 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननीमध्ये (Pathari Assembly Elections) दीपक सिंग उत्तमराव सिसोदिया अपक्ष , तुकाराम धोंडीबा रुमाले वंचित बहुजन आघाडी ,शेख निसार शेख अमीन अपक्ष , विठ्ठल सोपान उजगरे अपक्ष, अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्राणी एनसीपीएस ,शेख कदीर शेख खाजा अपक्ष, सईद खान शेरगुल खान शिवसेना, सुरेश किशनराव फड वंचित बहुजन आघाडी, निर्मला उत्तमराव गवळी ( 2 नामनिर्देशनपत्र बाद) एनसीपीए ,नारायण तुकाराम चव्हाण मराठवाडा मुक्ती मोर्चा, शेख मुस्ताक शेख रजाक अपक्ष, छाननी आणती 47 उमेदवारांचे 65 नामनिर्देशन पत्र वैध ठरली . असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली आहे. यावेळी त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड , तहसीलदार शंकर हांदेशवार , तहसीलदार सुनील कावरखे, मुख्याधिकारी तुकाराम कदम, मानवत न.पा.च्या मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी सहकार्य केले.
गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी सायं 6 .15 वा. पर्यंत व दिवाळी सुट्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वा .पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.