परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथील घटना
पाथरी (Pathari Crime) : शेतामध्ये कामासाठी गेलेल्यांचे घर भरदिवसा फोडत अज्ञात चोरट्यांनी १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना पाथरी तालुक्यातील देवनांद्रा येथे रविवार १ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यांवर पाथरी पोलिसात (Pathari Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
उत्तमराव भाऊराव टेकाळे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे पत्नी सोबत घराला कुलूप लावुन देवनांद्रा शिवारातील शेतामध्ये कामाला गेले होते. दुपारच्या सुमारास फिर्यादीच्या पुतण्याच्या पत्नीने फोन करुन तुमच्या घराचे दार उघडे दिसत असून कुलूप तुटलेले आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी घरी आले. त्यांनी पाहणी केली असता घरातुन रोख ३५ हजार रुपये, सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले. एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा दाखल (Pathari Crime) करण्यात आला असून तपास पोउपनि. कुलकर्णी करत आहेत.