परभणीतील पाथरी कृउबा परिसरातील घटना; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
परभणी (Pathari Crime) : पाथरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या व्यापार्याचे दुकान फोडत दुकानातील लॉकर मधून ३ लाख २० हजार रुपयांचा रोकड लंपास करण्यात आली. ही घटना बुधवार ६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. या (Pathari Crime) प्रकरणी अज्ञात चोरट्यावर पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इश्वर प्रसाद लाहोटी यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या शेजारी असलेल्या दुकानामध्ये चोरी झाली. चोरट्यांनी फिर्यादीच्या दुकानात प्रवेश करत कॅबीनमधील लॉकरमध्ये ठेवलेली ३ लाख २० हजार रुपयांची रोकड लंपास केली. पााथरी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास सपोनि. कापुरे करत आहेत. चोरीच्या या घटनेनंतर बाजारपेठ परिसरात भितीचे वातावरण आहे. चोरट्यांचा शोध लावावा, अशी मागणी व्यापार्यांमधून होत आहे.
बसस्थानकात पाकिट माराला पकडले
परभणी : येथील बसस्थानकात प्रवाशाजवळील पाकिट चोरत असताना एका चोरट्याला पकडण्यात आले. ही (Pathari Crime) घटना ६ नोव्हेंबरला दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. पवन आडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सलमान खान याच्याविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. अनंतपुरे करत आहेत.