पाथरी (Pathari Accident) :परभणी/मानवतहुन केकरजवळा गावाकडे जाणाऱ्या दुचाकींचा (Pathari Accident) अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. दुचाकीवरील सात वर्षाची चिमुकली सुदैवाने बचावली. अपघातातील मयत हा मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील रहिवासी आहे. ही घटना पाथरी पोखर्णी रस्त्यावर पोहेटाकळी शिवारात 12 जून रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली.
पाथरी पोखरणी रस्त्यावर पोहेटाकली शिवारात अपघात
मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील हनुमान बाबुदेव जोशी वय 47 हे आपली दुचाकीवरून 12 मे रोजी सकाळी मानवत येथील आपल्या बहिणी कडे गेले होते. बहिणी ला भेटून ते दुपारी 2 च्या सुमारास मानवत हुन केकरजवळा कडे आपली नात श्रीनिधी गौरव शिराळे वय 7 सोबत घेऊन (Pathari Accident) पाथरी पोखरणी रस्त्यावरून निघाले होते. 2.30 च्या सुमारास त्यांच्या दुचाकी ला पोहेटाकळी शिवरात मदरशा जवळ अपघात झाला. या अपघातात हनुमान जोशी जागीच ठार झाले. त्यांची नात श्रीनिधी शिराळे ही सात वर्षाची मुलगी मात्र या अपघातात बालंबाल बचावली आहे. अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही. दरम्यान अपघातात ठार झालेले हनुमान जोशी यांना पाथरी येथील (Pathari Hospital) ग्रामीण रुग्णालयात अॅम्बुलन्स मधून दाखल करण्यात आले. हनुमान जोशी यांना मुलबाळ नव्हते, त्यांच्या पाश्चय पत्नी भाऊ असा परिवार आहे.