पाथरी (Pathari Crime) : परभणी/पाथरी तालुक्यातील गोदावरी पट्ट्या मधून होत असलेल्या (Illegal mining case) अवैध वाळू उत्खनन प्रकरणी केवळ उपविभागीय अधिकारी हेच कारवाई करत असून महसूल नियुक्त केलेले पथके काय करत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान संध्याकाळी व शनिवारी पहाटे उपविभागीय अधिकारी यांनी दोन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत, (Tehsil Office) तहसील कार्यालयामध्ये पुढील कार्यवाही साठी वाहने लावले आहेत.
परभणीच्या पाथरी तालुक्यातील अवैध गोणखणीत उत्खनन प्रकरणे
पाथरी तालुक्यात ७४ किलोमीटर पेक्षा अधिक किनारी भाग असलेल्या गोदावरी नदी पात्रामध्ये सध्या (Illegal sand transport) अवैधरित्या वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे . हे थांबवण्यासाठी महसुल विभागाकडून वार निहाय पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, सेवक व एक पोलिस शिपाई अशी रचना करण्यात आलेली आहे. एका पथकाला आठवड्यातून एक वेळेस संध्याकाळी गस्त घालण्यासाठी सांगण्यात आलेले असताना या पथकांनी आतापर्यंत किती कारवाई केल्या हे गुलदस्त्यात आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी पकडले अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने
प्रत्येक वेळी तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी हेच कारवाई करताना पुढे आलेले दिसतात. त्यात (Sub-Divisional Officer) उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या कारवाया मोजण्या इतपत आहेत व त्यानंतर तहसीलदार यांनी केलेले कारवाई व ठराविक व त्याच-त्याच तलाठी यांच्या नेतृत्वात झालेल्या कार्यावाही दिसून येत आहेत. मग बाकीचे पथकातील सदस्य काय करतात ? त्यांचा कारवाईचा आलेख काय आहे? हा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागील सहा महिन्यातील त्यांच्या नियुक्त केलेल्या पथकांनी केलेल्या कारवाईचा अहवाल मागवणे अपेक्षित आहे व कामकुचराई करणाऱ्या पथकांतील सदस्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. कारण त्यांनी केलेल्या काम कुत्रामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल गौणखणीज चोरीमुळे बुडाला आहे.
शुक्रवार २४ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास तालुक्यातील मर्डसगाव येथे अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करणारे ट्रकटर क्रमांक एमएच २२ एएम ३६६९ हे उपविभागीय अधिकारी श शैलेश लाहोटी यांनी स्वताः जप्त करून करून दंडात्मक कार्यवाहीसाठी (Tehsil Office Pathari) तहसील कार्यालय पाथरी येथे अटकावून ठेवले आहे. या ट्रॅक्टर मध्ये ०१ ब्रास अवैध रेती आढळून आलेली आहे शनिवार द २५ मे रोजी पहाटे ०३.३० च्या सुमारास बाभळगाव फाटा येथे केलेल्या दुसऱ्या कारवाईत उपविभागीय अधिकारी व त्यांच्या पथकातील कर्मचारी हे गस्त करत असतांना अवैध रेती वाहतूक करणारे टाटा हायवा वाहन क्रमांक ( उपलब्ध नाही ) हे जप्त केले आहे. वाहनामध्ये अंदाजित ४.५० ब्रास अवैध रेती आढळून आली असून दंडात्मक कार्यवाहीसाठी पुढील कार्यवाही सुरु केली असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
मसला तांडा शिवारातील गट क्रमांक १० मध्ये माती उत्खननाचा परवाना घेत गट क्रमांक ८ च्या बाजूला गोदावरी नदीपात्रामध्ये माती उत्खनन करत मोठ्या प्रमाणावर गौणखणीत चोरून नेल्याचे प्रकरण दैनिक देशोन्नतीने उघडकीस आणले होते. या प्रकरणात याठिकाणी प्रशासनाकडून ईटीएस मोजणी करत संबंधित व्यक्तीवर कारवाई होणे अपेक्षित असताना आतापर्यंत याप्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. महसूल प्रशासन या प्रकरणी कधी कारवाई करणार ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांतून विचारला जात आहे.
तालुक्यातील उमरा गावाशेजारी (Illegal sand transport) अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा क्रं .एम एच २६ बीई ३०७३ पलटी झाल्याची घटना १३ मे रोजी घडली होती . याही प्रकरणी दैनिक देशोन्नती बातमी येत सदरील हायवाचा फोटो व हायवा क्रमांक नमूद करूनही (Revenue Administration) महसूल विभागाकडून याप्रकरणी कोणतीही कारवाई किंवा पोलिसात तक्रार देण्यात आलेली नसल्याने एकूणच प्रशासनाच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.