पालकांतून स्वागत; सार्वजनिक ठिकाणी बसुन छेडछाडीच्या वाढल्या आहेत घटना
परभणी/पाथरी (Pathari Ex-Corporator) : पाथरी शहरातील शैक्षणिक परिसरामध्ये असणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी बसून मुलींची छेडछाड काढणाऱ्या रोड रोमिओ चे बैठकीचे ठिकाणे एक मोहीम राबवत उध्वस्त करण्यात आले असून माजी नगरसेवक अलोक चौधरी यांनी राबवलेल्या मोहिमेचे आता पालकांतून स्वागत होत आहे. गेल्या काही दिवसात पाथरी शहरात मुलींच्या छेडछाडीच्या घटनांत वाढ झाली आहे.
शाळे बाहेर अनेक तरुण टोळक्याने उभे राहत मुलींची छेड काढत आहेत. दरम्यान शिक्षक कॉलनी, शिवाजी नगर या भागातील नागरिकांनी रोड रोमियो वर कारवाई करण्याची मागणी केली होती. घटनेचे गांभीर्य पाहता शिक्षक कॉलनी भागातील माजी नगरसेवक अलोक चौधरी यांनी शाळा कॉलेज मार्गात तरुण टोळक्याचें बसण्याचे अड्डेच जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केले आहेत. (Pathari Ex-Corporator) यामुळे पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून माजी नगरसेवक अलोक चौधरी यांचे कौतुक होत आहे.