परभणी/पाथरी (Pathari farmer) : मागील काही दिवसापासून 45 डिग्रीपर्यंत वाढलेल्या (heatstroke) तापमानाचा फटका तालुक्यातील वडी येथील शेतकऱ्याला बसला असून ऐन पेरणीच्या तोंडावर बैल जोडीतील एका बैलाचा मृत्यू (Bull died) झाल्याने या शेतकऱ्या वर संकट कोसळले आहे. पाथरी तालुक्यातील वडी येथील (Pathari farmer) राजेभाऊ रानुबा शिंदे, हे अल्पभुधारक शेतकरी असुन त्यांना स्वत:ची ४ चार एक्कर शेती आहे.
वडी येथील घटना
गावातील इतर शेतकऱ्याची शेती ते मुनाफ्याने बैल जोडीच्या जिवावर करुन आपल्या कुंटूंबाचा प्रंपच चालवत आहेत. त्यात या वर्षी त्यांनी दोन तीन शेतकऱ्याची शेती ही ठोक्याने वाहुन देण्यासाठी केली होती. बुधवार २९मे रोजी त्यांच्याकडील बैलजोडी मधील एका बैलाचा उष्माघाताने मृत्यू (Bull died) झाला आहे. अवघ्या काही दिवसावर पेरणी येवुन ठेपली असताना व शेतातील उन्हाळी मशागतीची कामे चालु असताना या शेतकऱ्याच्या बैलाने साथ सोडल्याने शेतकरी हवालदिन झाला आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहणार
शेतकरी राजेभाऊ शिंदे यांनी (heatstroke) उष्माघाताने बैलाचा मृत्यू (Bull died) झाल्यानंतर सज्जाचे तलाठी यांना पंचनामा करण्यासाठी फोन केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही तर पशुवैद्यकीय डॉक्टरांना मृत बैलाचे शेवविच्छेदन करण्याची विनंती केली असता घटनास्थळी बैलाचे शवविच्छेदन करणे शक्य नाही , बैलाला परभणी येथे घेऊन जावे लागेल , त्यासाठी वेगळा खर्च करावा लागेल असे म्हटल्याने या शेतकऱ्याने मृत बैलाचा जड मनाने अंत्यविधी केल्याचे दै . देशोन्नती प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे .पंचनामा व शवविच्छेदन न झाल्याने हा शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार आहे .