परभणीच्या मानवत तालुक्यातील वझुर बु येथील घटना, सुदैवाने जिवीतहानी नाही
परभणी/ मानवत (Pathari flood) : देशोन्नती वृत्तसंकलन तालुक्यातील वझुर बु येथे पाथरी आगाराची मुक्कामी असलेली मानवत – वझुर ही बस अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात वाहुन गेली. ही (Pathari flood) घटना सोमवार २ सप्टेंबर रोजी पहाटे ३-३० च्या सुमारास घडली सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
पाथरी आगाराची एम.एच.२२ बि.एन.०१७८ हि बस रविवार १ सप्टेंबर रोजी सांयकाळी ७ वाजता मानवत ते वझुर बु येथे मुक्कामी गेली होती .बस मुक्कामी गेल्यावर चालक सुदाम दहे व चालक पंडीत देशमुख यानी आपली बस वझुर बु.बसस्थानकावर उभी करुन एका शेड मध्ये झोपले होते परंतु पहाटे ३-३० च्या सुमारास अचानक शेड मध्ये पाणी आल्याचे दोघांच्या ही लक्षात आले त्यामुळे समयसूचकता दाखवत चालक सुदाम दहे यांनी बस चालु करुन गावाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रेकच्या हवेची टाकी भरण्यास वेळ लागला तोपर्यंत अचानक नदीला आलेले पाणी बस मध्ये शिरल्याने चालक व वाहक यांनी त्या ठिकाणांहून आपला जिव वाचवत पुलावरून वझुर खु या गावाकडे धाव घेतली. तोपर्यंत पुराचे पाणी पुलावर देखील आले. पहाता पहाता या (Pathari flood) पुराच्या पाण्यात पाथरी आगाराची ही बस नदीच्या पाण्यात जवळपास २० फुट वाहून गेली.
परंतु नदीच्या कडेला असलेल्या एका खांबाला ही बस अडकली सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या शिवाय (Pathari flood) पुराच्या पाण्यामुळे वझुर बु वझुर खु येथील बसस्थानक परीसरातील सर्व दुकाने पुरात वाहून गेली. त्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले सोमवारी पाथरी आगाराचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. परंतु नदीचे पाणी कमी न झाल्याने त्यांना काहीच करता आले नाही. परंतु मागील दोन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही वझुर पाण्याचा विळख्यात सापडले असून शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पाहवयास मिळत आहे.