पाथरी (Pathari Highway) : परभणीच्या/पाथरी शहराशेजारील भागात वीटभट्टीचालकांनी राष्ट्रीय महामार्गा (National Highway) शेजारील ड्रेनेजवर अतिक्रमण केल्याने शेतातून वाहुन येणारे पावसाचे पाणी थेट (National Highway) राष्ट्रीय महामार्ग ६१ वरून वाहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सोमवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसानंतर हे चित्र पाहायला मिळाले. पाथरी तालुक्यातून २ राष्ट्रीय महामार्ग व एक राज्य महामार्ग जातो. (National Highway) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ च्या बाजुला पाथरी शहरा शेजारी मोठ्या प्रमाणात वीटभट्टया टाकण्यात आल्या आहेत. राज्य महामार्ग क्रमांक ६१ शेजारी पोहेटाकळी शिवारामध्ये ही स्थिती आहे. वीटभट्टी महामार्गा शेजारी अगदी खेटून उभारण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हिवाळा व उन्हाळ्यात महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना धुराचा त्रास सहन करावा लागतो.
पावसाचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर; वाहतुकीला अडथळा
उभारण्यात आलेल्या वीटभट्ट्या ह्या महामार्ग व (Pathari Highway) राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी बाजूला पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेजवर अतिक्रमण करत उभारल्याने पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाण्यास कृत्रिम अडथळा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून हे पाणी थेट राष्ट्रीय महामार्गावर येत आहे .सोमवार १० जुन रोजी दुपारी झालेल्या जोरदार पाऊसानंतर पोहेटाकळी शिवारामध्ये (National Highway) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ शेजारील शेतातील पाणी सिंहगड दाल मिल ते कृषी महाविद्यालय दरम्यान असणाऱ्या महामार्गावरून वाहत होते. त्यामुळे पाथरीहून मानवतच्या दिशेने व मानवतहून पाथरीच्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत होती. शिवाय महामार्गालाही या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू झाल्याने संबंधित विभागाने या प्रश्नी तात्काळ लक्ष देत (Pathari Highway) राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग शेजारील ड्रेनेज व्यवस्था पूर्ववत करून द्यावी अशी मागणी होत आहे.