वन विभागाचा दुजोरा, ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे केले आवाहन
पाथरी (Pathari Leopard footprints) : तालुक्यातील वाघाळा येथे रविवारी संध्याकाळी स्थानिक शेतकऱ्यांनी (Leopard footprints) बिबट्या पाहिल्याचा दावा केल्यानंतर सोमवारी वन विभागाला माहिती दिल्यानंतर शेत शिवारात पाहणी करण्यात आली .यावेळी दिसून आलेल्या पाऊल खुणा बिबट्याच्या असल्या संदर्भात (Forest Department) वनविभागाकडून दुजोरा देण्यात आला असून परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी सतर्क राहत काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी शेख अब्बास यांनी रविवार २१ जुलै रोजी सातच्या सुमारास बिबट्या दिसल्याचा दावा केला .ही माहिती त्यांनी गावचे सरपंच बंटी पाटील यांना दिली यानंतर काही वेळाने महादेव शिंपले , आंगद नागरगोजे यांनी गावाशेजारील शेतामध्ये (Leopard footprints) बिबट्या पाहिल्याचे सांगितले .गाव शिवारात बिबट्या आल्याची बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सरपंच बंटी पाटील यांनी वन विभागाला या संदर्भात कल्पना दिली .सोमवार 22 जुलै रोजी वन विभागाचे (Forest Department) वनपाल विठ्ठल बुचाले यांनी ग्रामस्थांसह बिबट्या दिसलेल्या शेतामध्ये पाहणी केली . यावेळी शेतात दिसलेले पायांचे ठसे बिबट्याचे असल्याचे सांगितले आहे.
वाघाळा गावाशेजारील शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे उमटले आहेत . (Leopard footprints) बिबट्या हा प्राणी रात्री मध्ये वीस किलोमीटर पर्यंत चा प्रवास करतो. त्यामुळे गावापासून वीस किलोमीटर पर्यंत तो असू शकतो . शेतकऱ्यांनी शेतात जाताना सोबत काठी घेऊन जावी . काठीला घुंगरू बांधून आवाज करावा ,गळ्याला रुमाल बांधावा.
– वनपाल विठ्ठल बुचाले
गाव शिवारामध्ये (Leopard footprints) बिबट्या आल्याचे कानावर आल्याने गावातील शेतकरी , मजूर यांनी शेताकडे जाणे टाळले आहे . त्यामुळे दिवसभर शेत शिवारामध्ये कामे ठप्प पडली होती व शुकशुकाट झाला होता . लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे . (Forest Department) वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी कडून करण्यात येत आहे.