विज बिल भरूनही वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण
पाथरी (Pathari mahavitaran ) : परभणी/पाथरीनियमित वीज बिल भरूनही वारंवार (Pathari mahavitaran) वीज पुरवठा खंडित होत असल्याने वैतागलेल्या देवानांदरा येथील ग्रामस्थांनी सोमवारी पाथरी शहरातील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पाथरी तालुक्यातील देवानांदरा येथील ग्रामस्थांनी सोमवार ८ जुलै रोजी शहरातील महावितरण उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन (Pathari Andolan) केले. यावेळी आंदोलकांनी गावास कायमस्वरूपी लाईनमन हेल्पर द्यावा , विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहीन्यावरिल झाडांची फांद्या काढाव्यात , भारनियमन कमी करावे , गावातील जुने विद्युत पोल व तारा बदलून द्याव्यात यासह थ्रीफेस विद्युत पुरवठा वारंवार खंडीत करु नये या प्रमुख मागण्याचे निवेदन दिले आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा
यावेळी अजय थोरे,परमेश्वर थोरे,लक्ष्मण थोरे,बालाभाऊ थोरे,राजेभाऊ बनगर, नामदेव थोरे,कृष्णा थोरे,सुरेंद्र थोरे,राजेभाऊ राऊत,हरिभाऊ टेकाळे, मल्लिकार्जुन थोरे,प्रताप साळवे,गोपीनाथ शिंदे,सिद्धेश्वर धोत्रे,दिनेश घाडगे,बाळासाहेब टेकाळे, रायभान थोरे,महेश थोरे, सुनिल खिल्लारे,दत्ता टेकाळे,लखन टेकाळे, रवी वाव्हळ,धोंडीराम थोरे,महादू कापरे,संतोष थोरात,माऊली थोरे ,भास्कर थोरे,संतराम टेकाळे आदी उपस्थित होते.
पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये महावितरण कडून त्रैमासिक बिलाची सक्तीची वसुली एकीकडे केली जात असून ग्राहकांना सेवा देण्यास मात्र तत्परता दाखवली जात नाही .
ग्रामीण भागातील विद्युत पोल व तारा या ३०ते ४० वर्षांपूर्वीच्या असल्याने जीर्ण झालेल्या असून अपघातास आमंत्रण देत आहेत. ग्रामीण भागातील विद्युत रोहित्रांची परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे .फ्युज बॉक्स मध्ये फ्युज ऐवजी थेट तारांचे गुंडाळल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळते. (Pathari mahavitaran) पावसाळ्यापूर्वीच विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या काढण्यात न आल्याने थोडा पाऊस आल्यानंतर किंवा वारे वाहिल्यानंतर विद्युत पुरवठा तासंतास खंडित होण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढले आहे.