विविध मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा
परभणी/पाथरी (Pathari Morcha) : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीदिनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पाथरी तहसील कार्यालयावर वाढती महागाई , बेरोजगारी ,शेतीमाल हमीभाव , शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, पिक विमा व कष्टकरी जनतेच्या विविध मागण्यासाठी शनिवार ३ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शनिवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरांमधून मोर्चा सुरुवात करण्यात आली .
हा मोर्चा सेंट्रल नाका , छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला असता या ठिकाणी कॉ . डॉ . उदय नारकर ( मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी , राज्य सेक्रेटरी ) ,संयोजक कॉ . रामकृष्ण शेरे , कॉ . रामराजे महाडीक , कॉ . अशोक बुरखंडे , कॉ . लिंबाजी कचरे , कॉ . दत्तुसिंग ठाकुर , कॉ . नसिर शेख ,कॉ . दिपक लिपणे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . यावेळी कॉ . उध्दव पौळ कॉ . रामेश्वर पौळ , कॉ . लिंबाजी धनले , कॉ . भागवत कोल्हे ,कॉ . गोकुळ शिंदे , कॉ . बळीराम वराडे , कॉ . ज्ञानेश्वर शिंदे ,कॉ . कल्याण जाधव , कॉ . बालासाहेब गिराम, कॉ . सुभाष नखाते , कॉ . राधाकिशन आव्हाड ,कॉ . भारत फुकेकानंद लांडगे ,कॉ . उत्तम जाधव ,कॉ.दत्तराव पंडीत ,कॉ . दत्ता काळे , कॉ . बंडु वरकड यांच्यासह मोठ्या संख्येने कष्टकरी कामगार व महिलांची उपस्थिती होती. दरम्यान उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी तहसील कार्यालय येथे मोर्चेकरांची भेट घेत निवेदन स्वीकारले.
प्रमुख मागण्या
2023-24 च्या खरीप व रब्बी हंगामात पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी दाखल केलेली असो वा नसो अश्या सर्वांना पिक विमा देण्याचे आदेश संबंधित कंपनीला द्या , 2024-25 च्या गळीत ऊस हंगामात 3500 / – रूपये प्रतिटन भाव द्या व मागील हंगामातील गंगाखेड शुगर , सायखेडा व नृसिंह कारखाना यांनी प्रतिटन 200 / – रूपये तात्काळ द्यावे , शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करून लगेच त्यांना पिक कर्ज द्या ,शेतकऱ्यांचे मोटार पंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करा , खते , बि – बियाने , औषधे यांचे दर निम्म्यावर आणून नियंत्रण ठेवा ,शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सी 2 + 50 % हमी भाव देण्याचा संसदेत कायदा करा , गायरान कसत असलेल्या भूमिहीन , दलितांना मालकी हक्क द्या , कंत्राटी पध्दत बंद करा ,सर्व तरुण सुशिक्षित बेरोजगारांना कायम नोकरी ची हमी द्या , खाजगी कंपन्यात आरक्षण लागू करा ,शिक्षण व आरोग्याचे सार्वत्रिकीकरण करा , 30 % वीज बिल वाढ रद्द करा , स्मार्ट मीटर चे धोरण रद्द करा व त्यांचे टेंडर वापस घ्या , विजेचे खाजगीकरण बंद करा , ग्रामीण घरकुलांसाठी रु .२.५० लाखांची तरतूद करा व शेतकऱ्यांसह शेतीवर कामकरणाऱ्या कष्टकऱ्यांना १० हजार रूपये दरमहा पेन्शन द्या . या प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता.