परभणी/पाथरी (Parbhani):- तालुक्यातील बाबुलतार गावातील बौध्दवाडा येथील समाज मंदिरासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला धडक देवून पुतळ्याच्या चष्म्याला ओढत उजवी काडी तोडली. यामुळे बौध्द धर्मियांच्या (Buddhist) भावना दुखावल्या या प्रकरणी एकावर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ ऑगस्ट रोजी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास घडली.
अर्धाकृती पुतळ्याला धडक देवून पुतळ्याच्या चष्म्याला ओढत उजवी काडी तोडली
शिवाजी निकम यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे २३ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास गावात फेरफटका मारत असताना समाज मंदिराजवळ आले. यावेळी त्यांना एकजण पुतळ्याला धडक देवून चष्म्याला ओढत असताना दिसून आले. घटनेची माहिती गावात पसरल्या नंतर जमाव जमा झाला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणी महादेव गालफाडे याच्यावर पाथरी पोलिसात (Police)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.