पंचायत समिती कॉम्प्लेक्स मधील गाळेधारकांचे प्रशासनाला निवेदन
परभणी/पाथरी (Pathari Panchayat Samiti) : पंचायत समिती कॉम्प्लेक्स परिसरामध्ये अवैधरित्या अतिक्रमण करत व्यवसायाकांनी दुकाने थाटल्याप्रकरणी कॉम्प्लेक्स मधील गाळेधारकांनी आक्षेप नोंदवत या प्रकरणी प्रशासनाने कारवाई करत अतिक्रमण काढावे अशी मागणी एका निवेदनातून शुक्रवारी केली आहे .
पाथरी पंचायत समिती (Pathari Panchayat Samiti) परिसरातील गाळेधारकांच्या वतीने प्रशासनाला शुक्रवार २१ मार्च रोजी निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की , पंचायत समिती मध्ये व्यवसाय करताना गाळेधारकांना परिसरातील अवैध अतिक्रमणाचा त्रास होत आहे असुन शांततेचा ही भंग होत असल्याचे म्हटले आहे. परिसरातील मोकळ्या जागेवर , आतमध्ये येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाले असल्याचे निदर्शनास आणून देत सदरील अतिक्रमण तात्काळ न काढल्यास व्यवसाय बंद करून लोकशाही मार्गाने गाळेधारक उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे .
यावेळी दिलेल्या निवेदनावर जगदिश गोपुलालजी लड्डा , पवन गोविंदप्रसाद लड्डा , रामभाऊ प्रल्हादराव खेत्री , युवराज चंद्रकांत काटकर , दिपकराव आतकरे ,कृष्णा बळीराम बंगाळ ,श्रीहरी कसपटे , हाजी अन्सारी आदीं गाळेधारक व्यापाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत .