पालकांनो शाळेच्या शासन मान्यतेची खात्री करुन पाल्याला शाळेत प्रवेश द्या!
पाथरी (Pathari school) : परभणी/पाथरी शाळेच्या (Pathari school) शासन मान्यतेची खात्री केल्याशिवाय आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश देऊ नका असे आवाहन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. गतवर्षी तालुक्यातील काही अनधिकृत इंग्रजी माध्यमाच्या शाळांना शासनाची परवानगी नसल्याचे समोर आले होते. काही शाळा मान्यतेच्या जागी ठेवता इतर ठिकाणी सुरु असल्याचेही निदर्शनास आले होते . त्यानंतर (Anandwan English School) आनंदवन इंग्लिश स्कुलचे डॉ. सलीम यांनी त्या शाळा बंद करण्यासाठी तहसील कार्यालया समोर उपोषणही केले होते तर हे अनधिकृत शाळेचे प्रकरण शिक्षण संचालकांपर्यंत पोहचले होते.
गटशिक्षणाधिकार्यांचे आवाहन
दरम्यान २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अशा (Pathari school) अनधिकृत शाळामुळे विध्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी सर्व पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश देण्यापूर्वी त्या शाळेस शासनाची परवानगी असल्याची खात्री करून घ्यावी . जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. यासंदर्भात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे गटशिक्षणाधिकारी यांनी याबाबत आवाहन केले आहे. कोणत्याही संस्थाचालकांनी (Pathari school) अनधिकृत शाळा व वर्ग सुरू करू नयेत असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.