परभणी/पाथरी (Pathri Agriculture) : मृग नक्षत्रापासून पावसाने साथ दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी (Kharif sowing) खरिप हंगामात केलेल्या पेरण्या जोमात असुन तालुका कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार तालुक्यातील चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी ४३ हजार ४८१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या केल्या आहेत.
सततच्या पावसाने खरीप हंगाम जोमात
पाथरी तालुक्यामध्ये ४९ हजार ५१८ हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. त्यापैकी ६ हजार हेक्टर क्षेत्रावर (Pathri Agriculture) शेतकऱ्यांनी ऊस व इतर बागायती पिकांची लागवड केलेली आहे .३१ जुलै रोजी तालुका कृषी विभागाचा अंतिम पेरणी अहवाल आला आहे. ज्यानुसार शेतकर्यांनी सर्वाधिक २० हजार ६६ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी आहे . दुसऱ्या क्रमांकाची पसंती कापुस लागवडीला दिली असुन १९ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर कापुस लागवड करण्यात आली आहे.
पाणीसाठ्यात वाढ नाही
तुरचे क्षेत्र ३ हजार ४६ हेक्टर एवढे असुन मुग ६७६ , उडीद १३५ , बाजरी ४७ , मका ३९ तर सर्वात कमी तीळ पिकाची १७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. (Pathri Agriculture) बाभळगाव महसुल मंडळात सर्वाधिक १२ हजार १८६ हेक्टर क्षेत्रावर (Kharif sowing) खरीपात पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ पाथरी महसुल मंडळात ११ हजार ८४२ हेक्टर , कासापुरी महसुल मंडळात ९ हजार ८०९ हेक्टर व हादगाव महसुल मंडळात ९ हजार ६५० हेक्टर क्षेत्रावर लागवड व पेरणी झाली आहे.
सोयाबीन कापसाचे सर्वाधिक क्षेत्र
मृग नक्षत्रा पासून पावसाने साथ दिली असल्याने यंदा शेतशिवारात मागील ५ वर्षाच्या तुलनेत पिक परिस्थिती चांगली आहे. सतत होणाऱ्या पावसाने सखल भागात असणारी खरीप पिके पिवळी पडत आहेत. (Pathri Agriculture) पिके जोपासणारा पाऊस पडत असुन जमिनीतील पाणीपातळीत वाढ झालेली नाही असे स्थानिक शेतकरी सांगत आहेत.
बाभळगाव महसूल मंडळात सर्वाधिक पेरण्या
दरम्यान, पाणलोट क्षेत्रात मोठ्या पाऊस पडला नाही. त्यामुळे तालुक्यात येणाऱ्या गोदावरी नदीवरील तीनही उच्च पातळी बंधाऱ्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर बंधारे भरतील अशी अशा स्थानिक शेतकऱ्यांना आहे. दरम्यान मागील दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून (Pathri Agriculture) शेतकरी अंतर्मशागती व पीक फवारणीच्या कामांमध्ये गुंतला आहे.