पुसद (Patriotic Competition) : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मुलांमध्ये शालेय जीवनामध्ये देशभक्तीची ज्योत तेवत ठेवन्यासाठी तसेच त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी विदर्भाची पंढरी पुसद येथील श्री ज्ञानेश्वर संस्थान आणि विश्वनाथसिंह बयास ना. सह. पतसंस्था म पुसद यांचे द्वारा १५ रोजी संस्थानच्या कै बापुराव चिद्दरवार स्मृती सभागृहामध्ये दुपारी १ ते ४ या वेळेत संपन्न होणार आहे.
ही स्पर्धा २ गटात होणार असून इयत्ता ५ वी ते ७ वी यांचा अ गट असून इयत्ता ८ वी ते १० वी यांचा ब गट या पद्धतिने ही देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न होणार आहे.दोन्ही अ आणि ब गटामध्ये प्रथम पारितोषिक १५००/- रू आणि संचामधील सर्व विद्यार्थी आणि शाळेला गौरव चिन्ह द्वितीय पारितोषिक -१०००/- आणि गौरवचिन्ह प्रत्येकास ,तृतीय बक्षीस – ७००/- आणि गौरवचिन्ह प्रत्येकास आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धा संपन्न झाल्यावर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सायंकाळी ५:०० वाजता संपन्न होणार आहे या साठी विश्वनाथ बयास नागरी सहकारी पतसंस्था म पुसदचे अध्यक्ष निशांत बयास हे उपस्थित रहाणार आहेत.या स्पर्धेसाठी सर्व शाळांना आणि शिक्षक वृंदाना आमंत्रण पत्र दिलेले आहे.आणि जवळपास १९ संचांनी या स्पर्धेसाठी विविध शाळांनी नावे नोंदविली आहे.तरी जनतेने आणि सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष बिपीन चिद्दरवार यांनी कळविले आहे.