पातूर (Patur Accident) : शहरातील टीकेव्ही चौकातून जाणाऱ्या खानापूर मार्गावर जल प्राधिकरणकडून मोठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात नालीचे खोदकाम केले जात असून या खोदकामामुळे (Patur Accident) रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू झाली असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यावर दुतर्फा दुकाने असून दुकानांसमोर मातीचे ढिगारे आणि माती रस्त्यावर साचत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पाइपलाइन लिकेजमुळे रस्त्यावर पाणी ओसंडून वाहत असून मातीवरून घसरल्यामुळे अनेक (Patur Accident) अपघात झाले आहेत. आतापर्यंत या ठिकाणी दिवसान दिवस अधिक अपघात घडले असून, त्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. या समस्येचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांनी संबंधित विभागाने पाइपलाइनच्या कामामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करावी. माती उचलून रस्ता पूर्ववत करावा, अन्यथा ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नंदू येनकर ग्रामस्थ: दिवसेंदिवस रस्त्यावरून जाणे अवघड होत आहे लहान मुले महिला व कर्मचारी वर्ग रस्त्याने ही जा करत असते रस्त्यालगत शाळा व शिकवणी वर्ग असल्याने येणे जाणे कठीण झाले आहे