पातूर (Patur city) : आपले दैनंदिन जीवन जगत असताना समाजासाठी काही देणे असते ही जाण ठेवत वीज तांत्रिक कामगारांनी गरजूना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासली. पातूरच्या तांत्रिक कामगार युनियन च्या कामगारांनी गरजूना मदत करीत वृक्षारोपण करीत आपल्या संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला.
अल्पवधीतराज्यभरातसर्वाधिकसंख्या असलेल्या तांत्रिक कामगार युनियन ५०५९ चा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तांत्रिक कामगार युनियन ५०५९ चे केंद्रीय उपाध्यक्ष गोपाल गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली हा सामाजिक उपक्रम पार पडला.
यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य संतोष निमकंडे, मंडळ उपाध्यक्ष प्रवीण तायडे, महिला प्रतिनिधी सपना सुरवाडे, मंडळ संघटक पल्लवी गाडगे, महेंद्र खोकले, निलेश बोचरे, शुभांगी हेरोडे, कोमल इंगळे, शंकर पारस्कर, राजू सौंदळे, पंकज बनचरे, आशिष वानखडे, पूजेश गोळे, रणजीत जाधव, गोविंद घुगे, अक्षय मालसुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी (Patur city) आलेल्या सर्व पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत संघटनेच्या वाटचालीचा आढावा विषद केला. त्यानंतर गरजूना मदतीचा हात देत फराळ व मिठाई चे वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे संचालन रमेश तायडे यांनी केले. तर आभार शुभांगी हिरोडे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य तांत्रिक बांधव उपस्थित होते. तांत्रिक कामगार युनियन ५०५९ चा वर्धापन दिन उत्सहात साजरा करण्यात आला.