जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर यांची मागणी
पातुर (Patur Heavy Rain) : शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने परत सर्वत्र शेतीचे नुकसान झालेले आहे. या (Heavy Rain) नुकसानांमध्ये बाभूळगाव मंडळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असल्यामुळे शेतीचे पीक हातात येईल की नाही याची खात्री नाही आहे. शक्यतोवर पीक खराब झाले आहेत. त्यामुळे अतिवृष्टीने झालेले नुकसानांमध्ये सोयाबीन पीक दूर कपाशी उडीद मुंग यांचे नुकसान झालेले आहे. त्यांचे त्वरित सर्वे करून पंचनामे करावे करिता पातूर तहसीलदार यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील हटकर (Sunil Phatkar) यांच्यासह बाभूळगाव मंडळातील शेतकऱ्यांनी निवेदन दिले.
यावेळी चक्रधर बर्डे, राजेंद्र भाकरे, धम्मपाल इंगळे, राजेश गावंडे, वैभव फाटकर, विश्वनाथ पाचपोर, बाळकृष्ण बाल तिलक, मुकेश खरडे, नागेश भाल तिलक, अजय फाटकर ,ज्ञानेश्वर खर्डे, गोरखनाथ भाऊ, वैभव दुतोंडे, प्रफुल बर्डे, अभिजीत दुतोंडे, बस राम चव्हाण, सिद्धार्थ इंगळे, विनोदभाल तिलक, निलेश पाचपोर, सुभाष पाचपोर, आदी ग्रामस्थ सरपंच सदस्य आधी प्रामुख्याने उपस्थित होते.