मतदार दिनानिमित्त तहसील कार्यालय पातुर च्या वतीने स्पर्धेचे आयोजन…
पातुर (Patur) : 25 जानेवारीला मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृतीसाठी तहसील कार्यालय (Tehsil Office) पातुरच्या विविध तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुकास्तरीय (Taluka Level) रांगोळी स्पर्धेसाठी “वोट जैसा कोई नही वोट जरुरी डाले हम”हा विषय स्पर्धकांना देण्यात आला होता व याच विषयाला अनुसरून रांगोळी काढुन मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून द्यायचे होते.
या स्पर्धेमध्ये तालुक्यातून वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयातील (College Students) विद्यार्थिनींनी प्रथम, द्वितीय व तृतीय हे तिन्ही क्रमांक प्राप्त तालुक्यातून अव्वल येण्याचा मान मिळवला आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी कु. आरती सुरेंद्र तायडे व कु. तृप्ती भैरवनाथ खरात या विद्यार्थ्यांनी ठरल्या असून द्वितीय क्रमांक कु. गायत्री पांडुरंग जामोदे हिने पटकावला तर तृतीय क्रमांक कु. गायत्री तेजराव नाकट हिने प्राप्त केला.
विजयी स्पर्धकांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार!
या विजयी स्पर्धकांचा पातुर तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री राहुल वानखेडे सरांनी प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. या स्पर्धकांचे संस्थेचे संस्थापक/सचिव मा. श्री रामसिंगजी जाधव साहेबांनी कौतुक केले, तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) आयोजित कार्यक्रमात प्राचार्य. एस. एम सौंदळे सरांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. या विजयी स्पर्धकांच्या (Winning Contestant) घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.