पवनी (Pauni Accident) : तालुक्यातील पवनी-कोरंभी रस्त्यावर आज दुपारी ३ वाजतादरम्यान झालेल्या (tractor-motorcycle accident) ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शुभम अर्जून मेश्राम (२४) रा.कोरंभी, असे मृतकाचे नाव आहे. कोरंभी येथील शुभम मेश्राम हा आज मोटारसायकल गाडीने पवनी (Pauni Accident) येथे येत असताना महादेवाच्या रस्त्याजवळ चौरस्ता क्रॉस करीत असलेल्या ट्रॅक्टरवर आदळला. त्यात दुचाकीस्वार शुभम मेश्राम याचा जागीच मृत्यू झाला.
पवनी-कोरंभी रस्त्यावरील घटना
घटनेची माहिती (Pauni Police) पवनी पोलीसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनाकरीता (Pauni Hospital) पवनी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतक हा मोलमजुरीचे काम करीत होता. त्याच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचे मृत्यूपश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहिन, असा परिवार आहे. अपघातग्रस्त ट्रॅक्टर कोरंभी येथील असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची नोंद (Pauni Hospital) पवनी पोलीसात केली असून, पुढील तपास पोनि निलेश ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनात पोउपनि जितेंद्र तिजारे करीत आहेत.