एकाचा जागीच मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी
पवनी (Pauni Road Accident) : पवनी व नागभिड तालुक्यातील सीमेवरील भुयार-काम्पा महामार्गावर आज सकाळी ९ च्या सुमारास पिकअप-ट्रकच्या भीषण अपघातात (Pauni Road Accident) एका जणाचा जागीच मृत्यू तर ८ जण गंभीर जखमी व इतर १८ महिला किळकोळ जखमी झालेल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साठगाव कोलारी येथील पिकअप व्हॅन क्र.एम.एच.३४/बी.जी.१७२० हे २५ पुरुष व महिलांना नागभीड तालुक्यातील डोंगरगाव, पेंढरी, कसरला व नागभिड येथून सोयाबीन कापणीसाठी उमरेड तालुक्यातील धुरखेडा येथे घेऊन जात असताना काम्पा व भुयार या दोन्ही गावाच्या मध्यभागी महामार्गात नागपूर दिशेने येत असलेला अठरा चाकी ट्रकने सकाळी उमरेड दिशेकडे जाणार्या (Pauni Road Accident) पिकअपला धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की पिकअप गोल गोल फिरत खाली कोसळून उभे झाले. यात गायत्री रोशन हेमने (३६) रा. डोंगरगाव यांचे जागीच मृत्यू झाले तर इतर २४ मजुरांना ग्रामीण रुग्णालय पवनी येथे हलविण्यात आले.
यात गोपालदास नशिने ४८, ज्योती नशिणे ४६, विलास मंडपे ४३, संगीता श्रीरामे ५२ सर्व रा. पेंढरी, जमुना भेंडारकर ५८, जिजाबाई हेमने ६०, मिना हेमने ४५ सर्व रा. डोंगरगाव व राखी सुखदेवे २८ रा. कसरला हे गंभीर जखमी झाले असून ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून त्यांना भंडारा येथे रेफर करण्यात आले आहेत. तर उर्वरित माया मेश्राम, वैजंता रामटेके, राजू कांबळी, भाऊराव हेमने, शारदा हेमने, ज्योती नशिने, शेषकला धनविजय, सुषमा हजारी, बेबी श्रीरामे, सुनीता मंडपे, कांता मेश्राम, इंदु मडावी, मुकरा दडमल, कमल जामुळे, कुसुम बोरकर आदी किरकोळ जखमी झाले असून त्यांचे उपचार ग्रामीण रुग्णालय येथे सुरू आहेत. (Pauni Road Accident) माहितीनुसार ट्रकचालक ट्रक घेऊन पसार झाला आहे तर सदर घटना नागभीड जिल्हा चंद्रपूर हद्दीतील आहे. सदर मृतकाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. यावेळी सर्व रुग्णांवर प्राथमिक उपचार ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी केले.