नाशिक (Nashik):- मुंबई रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सध्या तपी एकच रामबाण उपाय म्हणजे शरद पवारांनी (Sharad Pawar) रास्ता मार्गे नाशिकला यावे, असे आवाहन ज्येष्ठ व्यापारी कृष्णा नागरे यांनी केले आहे. विधिमंडळात नाशिकच्या आमदार सीमा हिरे देवयानी फरांदे यांनी आवाज उठविला असला तरी अद्याप कुठलीही कृती झाली नाही. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नागरे यांनी म्हटले आहे की, नाशिक-मुंबई महामार्ग जणू काही मृत्यूचा (Dead)सापळा बनला आहे.
सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांनी प्रयत्न करूनही ते काही करू शकले नाहीत
विशेष करून नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) व बांधकाम मंत्री दादा भुसे यांनासुद्धा अधिकारी वर्ग, प्रशासन दाद देत नसल्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. सर्व व्यापारी वर्ग, वाहतूकदार फार मोठ्या प्रश्नाला तोंड देत आहे. महाराष्ट्रातील फार मोठा व्यापार मुंबईमध्ये (Mumbai) असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये फार मोठा असंतोष पसरला आहे. येणा-या विधानसभेमध्ये याचा नक्की अनुभव सध्याच्या सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच सर्व व्यापारी व नाशिककरांची खूप मोठी अपेक्षा व विनंती खासदार शरद पवार यांनाच आहे की, यापूर्वी आपण संरक्षण मंत्री असताना बाय रोड मुंबईहून नाशिकला आले होते. त्या वेळची अवस्था पाहून तेव्हा त्यांनी त्वरित जागा घेऊन तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्या माध्यमातून त्वरित हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लावला होता. आताही नाशिककर व त्रस्त नागरिकांची, व्यापारी संघटनेची विनंती आहे की, येत्या २० तारखेला आपण नाशिक जिल्ह्यावर दौऱ्यावर येणार आहातच. तरी आपण बाय रोड प्रवास करावा, अशी विनंती व्यापारी कृष्णा नागरे यांनी केली आहे.