पातुरच्या तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन
पातूर (Patur soybeans) : सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊन सरकारी खरेदी सुरू करा, अशा मागणीचे निवेदन पातुर तालुक्यातील शेतकरी राजा ग्रुप यांच्या मार्गदर्शनात तहसीलदारांना नुकतेच देण्यात आले आहे. सोयाबीन हे पीक महाराष्ट्राचे मुख्य पीक असल्याने पातुर तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी सोयाबीन पेरणीला पसंती देतात, परंतु दिवसेंदिवस खत बियाणे मशागती आदी महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु गेल्या दहा वर्षापासून (Patur soybeans) सोयाबीन पिकांचे भाव जैसे थे आहे.
अस्मानी संकटामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी सोयाबीनला जे भाव होते. ते भाव आज सुद्धा तेच आहे. त्यामुळे आजच्या तुलनेत सोयाबीन पेरणीपासून काढणी पर्यंतचा खर्च सुद्धा निघत नाही, त्यामुळे (Patur soybeans) सोयाबीनला सहा हजार रुपये क्विंटल भाव देऊन सरकारी खरेदी करा अशा मागणीचे निवेदन पातुर तालुक्यातील शेतकरी राजा ग्रुप यांच्या वतीने तहसीलदारांना दिले आहे.