पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक
अर्जुनी/मोरगाव (Arjuni Police) : तालुक्यात आगामी येणारा गणेश उत्सव सण मोठ्या थाटात साजरा करण्यात येत असतो. एक गाव एक गणपती अभियान तालुक्यातील अनेक गावात राबविला जातो. यावर्षीच्या दि. 07 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर पर्यंत गणेशोत्सव सण शांततेत साजरा व्हावा आणि गणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच गणेश उत्सवा दरम्यान मुस्लिम बांधवांचा ईद सण येत आहे.
देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या उपस्थित संपन्न
शांतता तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या विशेष उपस्थितीमध्ये पोलीस स्टेशन अर्जुनी/मोरगाव येथे आज दि.05 सप्टेंबर 2024 रोजी गुरुवारला सकाळी 10:00 वाजता शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला तालुक्यातील पोलीस पाटील,शांतता समिती व गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य यांना गणेश उत्सव साजरा करतांना शांततेत तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कोणत्याही जाती धर्मात तेढ निर्माण होणार नाही. तसेच मोठ्या आवाजात ध्वनी प्रदुषण होणार नाही, डिजे वाजविण्यास सुद्धा मनाई केले आहे.
ज्या मंडळाकडुन नियमाचे उल्लंघन झाल्यास कार्रवाई करण्यात येईल व देवरी उपविभागात येणाऱ्या सर्व नागरिकांनी शांततेत गणेश उत्सव साजरा करावा अशा सुचना आणि आवाहन देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी नागरिकांना तसेच उपस्थितांना केलेल्या आहेत.या बैठकिला अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के,गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष,सदस्य,पोलीस पाटील, शांतता समितिचे सदस्य यांचेसह ईतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.