परभणी (Parbhani) :- तालुक्यातील पेडगाव येथे पेडगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना (shivsena)अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या हस्ते शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. स्पर्धेच्या प्रारंभानंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घेतला.
स्पर्धेच्या प्रारंभानंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घेतला
सुहास देशमुख मित्रमंडळाकडून आयोजीत करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन स्कॉटीश अकॅडमी स्कूलच्या अध्यक्षा सोनल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी आयोजक सुहास देशमुख यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख मुंजाभाऊ टाकळकर, पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ शिंदे, तालुकाप्रमुख विठ्ठल रासवे, पाथरीचे माजी उपनगराध्यक्ष लालू खान पठाण, नगरसेवक अलोक चौधरी, युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल भाले पाटील, डॉक्टर सेल ग्रामीणचे जिल्हाप्रमुख डॉ. विश्वंभर देशमुख, माजी सरपंच लक्ष्मीकांत देशमुख, राजू देशमुख, अब्दुल हाफिज, माजी सरपंच शेख रसूल, माणिकराव खरवडे, पंडित देशमुख,शेख शगीर, श्रीधर देशमुख, ग्रामपंचायत सदस्य मोबीन कुरेशी, दादू, उपसरपंच पाशा मौलाना आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत अंतिम विजयी संघाला ५१ हजार रुपयांचे पारितोषिक आणि भव्य चषक सुहास देशमुख यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे. द्वितीय संघाला ३१ हजार रुपये आणि भव्य चषक राजू देशमुख यांच्या वतीने देण्यात येईल. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूस पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
माऊली बोचरे यांच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजासाठी अडीच हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह दिले जाईल, तर डी.के. देशमुख यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाजासाठी अडीच हजार रुपयांचे बक्षीस प्रदान केले जाईल.वेनाई मेडिकल्स यांच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजाला आणि पद्मावती ट्रॅक्टर यांच्या वतीने उत्कृष्ट यष्टिरक्षकाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. सुमारे एक लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच खेळाडूला शेख किराणा यांच्या वतीने ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अच्युत गायकवाड आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.