हिंगोली (Pediatrician Dr. Kanade) : दुपार उलटून गेली होती. अवघ्या सृष्टीला संध्याकाळचे वेध लागले होते . सिरसम येथील दांपत्य आपल्या चिमुकल्याला वाशिम येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. कानडे यांच्याकडे उपचार घेऊन महामार्गावरून परतीच्या प्रवासात होते बाजूला हिरवीगार शेतं, भरल्या शेतात वार्यावर डोलणारे हिरवीगार सोयाबीन बालकवींच्या कवितेतील हिरवळ दाटे चोहिकडे असं अतिशय आल्हाददायक आणि नयनरम्य निसर्ग मोटरसायकल अंतर कापत होती. आडगाव पाटी समोरील महामार्गावरील पुलाजवळ अचानक त्यांच्या टू व्हीलर समोर कुत्रा आला आणि त्याला जोरदार धडक बसून भिषण अपघात झाला. चालकाच्या हातातील गाडी सुटली तशी दूर घासात जाऊन डिव्हायडरला धडकली.
या अपघातात आईच्या कुशीत, डोक्यावरील टोपर्याच्या उबेत विसावलेलं मुल हातातून सुटलं आणि रोडवर दूर फेकल्या गेलं. क्षणभरात होत्याचं नव्हतं झालं. क्षणार्धात स्वतःला सावरत थरथरणार्या हातांनं वडिलांनी आपल्या चिमुकल्या उचलून घेतलं. मुल निपचित पडल होतं. आपलं मूल रडत नाही, काहीच प्रतिसाद देत नाही हे पाहून आईच्या काळजाचा ठोका चुकला . तिने टाहो फोडला. या अपघातात तिच्याही हाताला दुखापत झाली होती. जखमेतून रक्त भळभळत होतं; परंतु त्याकडे त्या माऊलीचा लक्ष कसं जाईल? आपल्या काळजाच्या तुकड्याला ती आंजात होती, गुंजात होती. हृदयाशी कवटळत होती. चिमुकल्याच्या काळजी बरोबरच कुणीतरी आपल्याला मदतीसाठी पुढे यावं या असेनं तिची नजर भिरभिरत होती.
बाप शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहोचण्यासाठी द्रुतगती महामार्गावरून जाणार्या वाहनांना मदतीसाठी याचना करत होता. दोन्हीहात जोडून विनवण्या करत होता; परंतु वेगवान, सुसाट सुटलेल्या वाहनांतून जाणार्यांना त्यांच्यासाठी वेळ द्यायला, मदत करायला थांबायला कुणीही तयार होत नव्हता. हळूहळू बघ्यांची गर्दी वाढत होती. परंतु प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे येत नव्हता. जस जसा वेळ जात होता तसतसी पित्याची काळजी तीळ तीळ काळीज चिरत होती. आईच्या काळजाचं पाणी- पाणी झालं होतं. माय धायमोकलून रडत होती. मदतीसाठी गयावया करत होती. तिच्या करुण याचणांनी जणू समद्या शिवाराला पाझर फुटला होता.धावणार्या वाहनांना थांबवण्यासाठी बाप सर्वतोपरी प्रयत्न करत होता.वेळ आपल्या गतीने पुढे सरकत होता.
आईच्या कुशीतील बाळ काहीच प्रतिसाद देत नव्हत. सिमेंट काँक्रीटच्या चार पदरी महामार्गावरून सुसाट धावणार्या गाड्या मात्र थांबत नव्हत्या. एखादा थांबलाच तर अपघात झालेला पाहून पळ काढत होता. दरम्यान ४:२० च्या सुमारास बालाजी काळे गुरुजी शाळेवरून घरी निघाले असताना त्यांची गाडी मात्र अपघातग्रस्तांपाशी थांबली. अतिशय संवेदनशील मनाच्या गुरुजींनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून लगेच आपल्या गाडीमध्ये अपघातग्रस्त दांपत्याला घेतले. कसलाही विलंब न करता गर्दीतून गाडी पुढे काढली. अतिशय चिंताक्रांत असलेल्या आईला मानसिक आधार देणारा सांत्वणापर जिव्हाळ्याचा संवाद गुरुजी प्रयत्नपूर्वक साधत होते . गाडी हिंगोली कडे मार्ग क्रमन करत होती. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता.दरम्यान हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपलब्ध असतील का? याबाबत गुरुजींनी फोनवरून विचारपूस सुरू केली. वेळ आपल्या गतीने पुढे सरकत होता. प्रसंग बाका होता. गुरुजीची गाडी हिंगोलीच्या दिशेने वेगाने आंतर कापत होती. १०-१२ किमी.गाडी पुढे गेली असेल इतक्यात आईच्या मांडीवर शांत पडलेल्या चिमुकल्याने टाहो फोडला. अतिशय दुःखद ,चिंताक्रांत आणि भयान वातावरणात आपण सुखरूप असल्याचा जणू कौलच बाळाने दिला. आईच्या जिवात जीव आला.
थोड्याच वेळात हिंगोलीतील निष्णांत बालरोग तज्ञ डॉक्टर तोष्णीवाल यांच्या हॉस्पिटलमध्ये बाळाला दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला काळजीपूर्वक तपासले आणि चिमुकला सुखरूप असल्याचा निर्मळा दिला. येव्हाना अपघातग्रस्तांचे नातेवाईक, मित्रमंडळी असे बरेच जण तिथे पोहोचले होते. बर्याच वेळा पासून जीव टांगणीला लागलेल्या मातेने देवाचे आणि मदत करणार्या गुरुजींचं मनोररमन पुन्हा पुन्हा आभार मानत होती. जमलेले नातेवाईक, मित्रमंडळी गुरुजींचे आभार मानत तर कुणी अभिनंदन करत होते. आपल्या प्रयत्नाचे सार्थक झालेले पाहून गुरुजींच्या चेहर्यावरून आनंद आणि समाधान ओसांडून वाहत होते. आपल्या भारत देशात दिवसभरात १,२६४ अपघात होतात आणि ४६२ मृत्यू या अपघातांत होत असतात. तासाचा हिशेब करायचा झाल्यास भारतात प्रत्येक तासाला ५३ अपघात होतात आणि त्यात १९ लोकांचा मृत्यू होत असतो.
अपघातानंतर पहिला तास मानला जातो. अपघात तातडीने मदत करणे म्हणजे जीवनदान आहे. अपघातानंतर ३०-४० मिनिटात जखमीवर उपचार झाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे सर्वानीच मदतीची भूमिका ठेवावी. मदत करणार्या त्या व्यक्तीला पोलिस चौकशीला बोलवत नाहीत. तसे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. उलट त्या व्यक्तींना शासनाकडून ‘जीवनदूत’ म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. . तरीही अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी लोक पुढे येत नाहीत हे दूरदैव आहे. दुःखाने विहळणार्या, काकुलतिणे मदतीसाठी याचना करणार्या अपघातग्रस्तांचे व्हिडीओ काढणारे महाभाग कमी नाहीत. मानवी मनाची ही असवेदनशीलता कुठल्या थराला आज पोचली आहे. आताच्या वेगवान काळात अपघातग्रस्तासाठी थांबून त्यांना मदत करायला आपल्याला वेळ नाही.
कुणाला तरी जीवनदान देण्याची ही संधी विधात्याने आपल्याला दिली आहे. कुणासाठी तरी आपण देवदूत बनू शकतो. आपल्या थोड्याशा प्रयत्नाने जीव वाचू शकतो. ही परोपकाराची भावना लोप पावत चालली आहे का? शिक्षणाने माणूस सुसंस्कारित होण्याऐवजी दुःखीतांच्या विहळणार्या वेदनांचे व्हिडिओ चित्रीकरण करून सोशल मीडियावर अपलोड करण्यात धन्यता म्हणत असेल तर अपघातानंतर मदत न मिळाल्यामुळे मृत्यूचे सर्वात जास्त प्रमाण आपल्याच देशात का असणार नाही? अपघातानंतर एका माजी आमदाराला १तास मदतच मिळाली नाही. अपघातग्रस्तांचे सामान चोरीला गेले. यासारख्या असंख्य बातम्या आपल्या वाचनण्यात ऐकण्यात येतात. या पार्श्वभूमीवर बालाजी काळे सारांना जीवनदूतासं शाब्बास गुरुजी…!सदरील घटनेची दखल शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के यांनी घेतली आणि बालाजी काळे गुरुजी यांचा गौरव केला आणि प्रोत्साहन दिले.