Digras :- येथील दुर्गोत्सव विसर्जन डीजे वाहन मिरवणुकीत वेगवेगळ्या आठ डीजेचे वाहन नियमबाह्य पद्धतीने मोडीफाय करून प्रचंड आकाराची साऊंड सिस्टिम नियमांचे उल्लंघन केल्याने दिग्रस पोलिसांनी आठ डीजे (DJ)वाहन दुर्गा उत्सवाची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर रात्री पोलीस स्टेशन दिग्रस येथे अाणून डिटेन केले. आरटीओ, यवतमाळ यांना कार्यवाही करण्याबाबत दिग्रस पोलिसांनी पत्र व्यवहार केला. आरटीओचे अधिकारी यांनी सदर आठ डीजे वाहनांची पाहणी करून डीजे वाहन मालकावर मोटार वाहन परिवहन कायद्याअंतर्गत १ लाख १३ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई (action) करण्यात आली.
आठ वाहन मालकावर १ लाख १३ हजार ५०० रुपयाचा दंड इ दुर्गोत्सव विसर्जन मिरवणुकीतील घटना
डीजे वाहन क्रमांक एम. एच. ४३ – १७५१ मालक राजू अप्पाराव रोडे (२५) रा. इंदिरानगर पुसद, वाहन क्रमांक एम. एच. १४ सीपी ८३८९ मालक प्रमोद मच्छिंद्र साळुंखे (३२) रा. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर, विना क्रमांक वाहन मालक सार्थक करपे (३०) रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर, वाहन क्रमांक एम. एच. २९ – ८०८३ मालक शुभम विष्णू राठोड (२४) रा. घाटोडी ता. पुसद, वाहन क्रमांक एम. एच. ४ डी. डी. ५५२८ मालक शंकर सुधाकर माटे (२६) रा. खडकदरी ता. पुसद, वाहन क्रमांक एम. एच. २५ पी २५९२ मालक परमेश्वर प्रकाश राठोड (२५) रा. वरंदळी ता. दिग्रस, वाहन क्रमांक एम. एच. ४४ आर ०३२१ मालक राजेश उल्हास चव्हाण (४०) रा. मोख ता. दिग्रस व वाहन क्रमांक एम. एच. ४३ एडी २५९६ मालक रोहित संजय गाडे (२०) रा. ईसापुर ता. पुसद यांनी श्री. दुर्गा विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वाहनांची नियमबाह्य मोडीफाय करून मोठं मोठे स्पीकर बॉक्स लावून नियमांचे उल्लंघन केल्याने दिग्रस पोलिसांनी आठ डीजे वाहन पोलीस ठाण्यात लावण्यात आले.
दिग्रस पोलिसांनी यवतमाळ आरटीओ (RTO)यांनी मोटार वाहन परिवहन कायद्याअंतर्गत आठ डिजेवर १ लाख १३ हजार ५०० रुपये दंडात्मक कारवाई केल्याने डीजेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.