वाहतूक पोलिसांची कारवाई
मानोरा (Penalty on Cow Transport Vehicle ) : आर्णी येथून वाहनात गो- माता कोंबून भरून जाणारे ओव्हरलोड वाहन दि. १६ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास विश्व हिंदू परिषद बजरंग दल मानोरा प्रखंडच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या मानोरा – मंगरुळनाथ रोडवरील लालमाती जवळ वाहन थांबवून पोलिसाना पाचारण केले. यावेळी पोलिसांनी ओव्हरलोड वाहनधारकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.
अकोला ते आर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या रोडवर दररोज वाहनात गोवंश कोंबून भरून ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी ( दि. १६ ) जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मानोरा प्रखंडने आर्णी, दिग्रस वरून गो – माता वाहनात भरून येणारे ३ ते ४ वाहन लालमाती जवळ थांबविले. या वाहनांपैकी एका वाहनात गो – माता कोंबून भरून ओव्हरलोड वाहतूक करताना आढळून आले. यावेळी बाजारातून जनावरे भरून येत असलेले ओव्हरलोड वाहनावर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे करण ठाकुर, जय पवार, मनिष राठोड, आशिष रुनवाळ, योगेश जाधव, कृष्णा राठोड, प्रशांत राठोड, महेश राठोड, साहिल राठोड, सचिन राठोड, मनोज राठोड, किशन जाधव, आकाश राठोड, आशिष राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.




