थाळीनादमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परीसर दुमदुमले
हिंगोली (old pension Yojana) : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शासकीय निमशासकीय कर्मचार्यांना जशास तशी सरसकट जुनी पेन्शन योजना (old pension Yojana) लागू करावी या मागणीसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर पेन्शन क्रांती थाळीनाद आंदोलन करून शासनाविषयी आक्रोश व्यक्त केला.
समान काम समान वेतन या राज्यघटनेतील तत्त्वानुसार जुने नवे हा भेद न करता १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचार्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम १९८२ व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण १९८४ सह भविष्य निर्वाह निधी सह जुनी पेन्शन योजना जशीचे तशी लागू करावी या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर तलाठी ग्रामसेवक आरोग्य विभाग लिपिक वर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी कृषी विभाग जलसिंचन विभाग वन विभाग यांच्यासह जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय विभागाचे हजारो कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी होते. आंदोलनाचे यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य (old pension Yojana) जुनी पेन्शन संघटनेच्या सर्व शिलेदारांनी प्रयत्न केले.
कर्मचार्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आंदोलनामध्ये आमदार तानाजी मुटकुळे, अॅड.सचिन नाईक, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, के.के. शिंदे, शामराव जगताप, डॉ.दिलीप मस्के, अयोध्या पौळ यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकार्यांनी उपस्थित राहून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या भावना पोहचवणार असल्याचे फोनद्वारे सांगितले. (old pension Yojana) जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कर्मचार्यांनी अनेक वेळा आंदोलन केले. शासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने अद्यापही आंदोलन केले जातच आहेत.
पावसामुळे तारांबळ
जुनी पेन्शन योजनेकरीता (old pension Yojana) कर्मचार्यांचे आंदोलन चांगलेच रंगात आले असताना अचानक पावसानेही दमदार हजेरी लावली; परंतु कर्मचार्यांनी देखील तितक्याच जोमाने आंदोलनस्थळही घोषणांनी गाजवले.