पुसद (Pusad):- मराठवाड्यातील ळमनुरी येथे केंद्र बिंदू असलेल्या भूकंपाचे(Earthquake) मराठावाड्यातील अनेक भागात तसेच विदर्भात वाशिम(Washim) जिल्ह्यात धक्के बसले. त्याचवेळी विदर्भ मराठावाड्याच्या सीमेवर असलेल्या पुसद तालुक्यात, सौम्य धक्के बसल्याचे काही नागरिकांनी देशोन्नती (Deshonnati) जवळ बोलून दाखविले.
जिल्ह्याच्या सीमेवरील काही गावातील नागरिकांना भूकंपचे सौम्य धक्के जाणविले
9 जुलै रोजी सकाळी साडे सहा तसेच सकाळी सव्वा सात वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे श्रीरामपूर येथील व्यावसायिक नितीन उत्तरवार यांनी सांगितले. तर येथील डॉ.रोहित राऊत यांनी देखील सकाळी चहा घेत असतांना त्यांना व त्यांच्या पत्नी यांना भूकंपच्या सौम्य धक्क्याचा अनुभव आला. आणखी अनेक जण भूकंपाच्या घटनेला दुजोरा देत आहेत. दरम्यान या बाबत तहसीलदार महादेव जोरवर यांना भ्रमणध्वनीवर(cell phone) संपर्क केला असता वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरील काही गावातील नागरिकांना भूकंपचे सौम्य धक्के जाणविले असल्याचे तेथील तलाठी यांनी माहिती दिल्याचे सांगितले.