रिसोड (Washim):- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त रिसोड येथिल गोपीनाथ मुंडे चौका मध्ये अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बाळासाहेब देशमुख महाविकास आघाडीचे जिल्हा समन्वयक यांनी आपले विचार व्यक्त करतांनी वरील उदगार काढले. यावेळी अनेक मान्यवरांनी मुंडे यांच्या प्रतिमेचे पुजन करून विचार व्यक्त केले.
गोपीनाथ मुंडे चौका मध्ये अभिवादन कार्यक्रम संपन्न
रिसोड येथिल मेहकर नाका येथिल लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)चौका मध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवानराव क्षीरसागर होते. प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब देशमुख महाविकास आघाडीची जिल्हा समन्वयक विश्वनाथ सानप, डाॅ.गरकल, सुभाषराव गरकळ, सेवानिवृत्त पि.आय.दिपक बुधवंत, नारायण सानप, टि.एस.इप्पर, संचालक बबनराव सानप, मंचकराव जाधव होते.यावेळी मान्यवरांच्या हास्ते लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिमेचे सामुहिक पुजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. गरकळ यांनी केले तर नगरपरिषद चे सेवानिवृत्त अभियंता बाबासाहेब देशमुख यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याला उजाळा दिला, लोकनेते मुंडे यांच्या राजकीय कारकीर्द मध्ये त्यांचे विचार हे बहुजणांच्या प्रगतीचे स्तोत्र आहल्याचे विचार व्यक्त केले.
मुंडे साहेबांनी आपल्या राजकीय कारकीर्द मध्ये कधीही दुजाभाव केला नाही
आजही चंद्रपुर सारख्या नक्षली जिल्ह्यातील त्यांच्या काही आठवणतुन त्यांचे कार्य अधोरेखीत होते.त्यांच्या जाण्याने राजकिय पोकळीसह, बहुजण समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगीतले, यावेळी नारायण सानप, विश्वनाथ सानप, सुभाषराव गरकळ, दिपक बुधवंत यांनी सुध्दा मुंडे साहेबांच्या जिवन पटातील अनेक दाखले दिले. अध्यक्ष भगवानराव क्षीरसागर, नारायण सानप, विश्वनाथ सानप, डाॅ.श्रीराम गरकल, पिआय.दिपक बुधवंत, सुभाषराव गरकळ सानप, मंचकराव जाधव, प्रा.मुंढे, भारत नागरे, अनिल गरकळ, सचिन इप्पर, आकाश आंधळे,सचिन चोपडे,यादवराव सभादिंडे यांच्या तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार दराडे यांनी मानले.