परभणी/पाथरी (Parbhani):- तालुक्यामध्ये काय चालू आहे ? असा प्रश्न सामान्य लोकांना पडत आहे . आधिच वाळू माफियांनी गोदावरी नदी पोखरून टाकलेली असताना आता माती माफीयांनी गोदावरी किनारी भाग पोखरण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व महसूलच्या परवानगीने सुरू आहे फक्त परवानगी दुसऱ्या गटात घेतली असून उत्खनन गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आले आहे . त्यामुळे महसूल प्रशासनाचे (Revenue Administration) भूमिका संशयास्पद झाली आहे .
वाळू माफिया नंतर माती माफीयांनी गोदावरी ओरबाडण्याचे केले काम
पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीमध्ये अवैध वाळू उत्खनन(Illegal sand mining) राजरोसपणे चालू असल्याचे पुराव्यासहित माध्यमांनी दाखवून दिले आहे. हाच प्रकार प्रशासनाला आटोक्यात आणता आलेला नसताना आता गौणखणीज लुटीची दुसरी घटना समोर आली आहे. पाथरी तालुक्यातील मसला तांडा येथील गट क्रमांक १० मध्ये महसूल प्रशासनाकडून माती उत्खननाची परवानगी घेत दुसऱ्याच ठिकाणी अवैधरित्या माती उत्खनन सुरू असल्याचा प्रकार शुक्रवारी अवघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार स्थानिक तलाठ्यांना(Local pools) माहित नाही. त्यामुळे महसूल प्रशासनात चालू असलेल्या कारभार संशयास्पद ठरत आहे .
सज्जा तलाठ्याचा अहवाल न घेताच उत्खनन सुरू
तालुक्यातील मसला तांडा येथील गट क्रमांक १० मध्ये महसूल प्रशासनाने ६ मे रोजी प्रशासनाने १०० ब्रास माती उत्खनन करण्यासाठी परवानगी (allowed) दिली आहे. ७ मे ते ११ मे या कालावधीत हे उत्खनन करण्यास परवानगी दिली होती. सध्या सज्जाचा चार्ज नवीन तलाठी गाडेकर यांना देण्यात आला असून डीएससी माझ्याकडे आहे. परंतु यासंदर्भात मला कोणतेही पत्र मिळालेले नसून त्यामुळे सदरील उत्खननासाठी कोणताही आवाहन आमच्याकडून प्रशासनाला देण्यात आलेला नाही .
महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद
माती माफीयांनी दिलेल्या स्थळा ऐवजी ढालेगाव बंधारा पासून अवघ्या काही मीटरवर दुसऱ्याच ठिकाणी म्हणजे ऐन गोदावरी नदीपात्रामध्ये अवैधरित्या उत्खनन(Illegal mining) सुरू केले आहे. उत्खनन गोदावरी नदी पात्रात शेजारील किनारी भागात धडी धरून मोठ्या पोकलेन द्वारे करण्यात येत आहे. माती वाहतूक करण्यासाठी हायवा ट्रक लावण्यात आलेले आहेत .ही माती नदीपात्रा बाहेर काढता यावी यासाठी रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे .सोबतच उथळ माथेने वैध पद्धतीने माती वाहतूक करण्यात येत आहे असा लोकांना भास व्हावा या पद्धतीने शहरातून दिवसा ही वाहने जात आहेत.