मंगरूळ येथे घडली घटना
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Farmer suicide) : सततची नापीकी व कर्जबाजारी पणामुळे ५५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या (Farmer suicide) केली. ही घटना चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे २९ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
चिखली तालुक्यातील मंगरुळ येथील रहिवाशी असलेले रामदास आनंदा गवते वय ५५ वर्ष यांच्याकडे मंगरुळ शिवारात गट नं ३६९ मध्ये अडीच ते तीन एकर जमीन आहे या जमिनीवर त्यांनी जिल्हा सहकारी बँकेकडून ६० हजार रुपये पीककर्ज घेतले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून सततची नापीकी होत असल्याने त्यांच्यावर (Farmer suicide) कर्जाचा बोजा झाला होता. परंतु यावर्षी कपाशी व सोयाबिन ही दोन्हीं पिक चांगलें उत्पन्न देणार या आशेपोटी त्यांनी पिकावर बँक कर्ज काढून खत औषधींचा खर्च केला होता परंतु अचानक सोयाबिन पिकावर हुमनी अळी आणि पिवळसर रोग्नाने आक्रमण केले तसेच कपाशीचे कीडरोगाने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे यावर्षीचे दोन्ही पीकाचे नुकसान झाले आता बँकेचे कर्ज कसे फेडावे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला.
त्यामुळे त्यांनी रात्रीच्या वेळी घरात सर्व जण झोपलेले आहेत याचीच संधी साधून त्यांनी राहत्या घराच्या गच्चीचे टॉवर चे सिमेंट काँक्रीटच्या कॉलमला पांढऱ्या रंगाच्या सुती दोरीने गळफास घेवून आत्महत्या (Farmer suicide) केली. सकाळी मुले झोपेतून उठली आणि वरच्या मजल्यावर गेले असता वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलांचा आरडा ओरडा सुरू झाल्याने आवाज एकूण गावकरी गोळा झाले आणि लगेच घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी अंढेरा पोलीसांना दिली. माहिती मिळताच तात्काळ ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास उगले व पवार यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचासमक्ष पंचनामा केला आणि भगवान भिकाजी सुरूशे वय ४४ यांच्या लेखी जबाब वरुण मर्ग दाखल केला आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने पत्नी, मुले , नातेवाईक यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.