मलगी शिवारात घडली घटना
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Farmer suicide Case) : सततची नापीकी व कर्जबाजारी पणामुळे 55 वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील जाबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना 8 नोव्हेबर रोजी 5.30 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.
चिखली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मलगी येथील 55 वर्षीय शेतकरी सिद्धेश्वर साळूबा शेळके यांच्याकडे मलगी शिवारात गट न 54 मध्ये जमीन 5 एकर जमीन आहे या जमिनीवर त्यांनी सेंट्रल बँक गांगलगाव या शाखेकडून शेती साठी पिककर्ज घेतले आणि त्यांनी यावर्षी शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली होती मात्र पिकावर रोग पडल्याने पिकाचे अतोनात नुकसान होवून गेले आणि उत्पन्नात मोठी घट झाली.
कसेबसे हाती आलेले सोयाबीन त्यालाही बाजारात कवडी मोल भाव त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आणि घरात कोणालाही काहीही न सांगता शेतात जावून जाबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने गावात शोककळा पसरली आहे. या (Farmer suicide Case) घटनेची माहिती मलगी येथील तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकांत सुधाकर राऊत कडूबा रंगनाथ शेळके, दिलीप शंकर शितोळे , दीपक शेळके, तुकाराम साते, यांनी पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर झाले मात्र वृत्त लिहेपर्यत पोलिसांनी मर्ग दाखल केला नव्हता.