नवी दिल्ली (Female feticide) : कन्या लक्ष्मी ही संपत्ती, समृद्धी आणि अन्नाची देवी आहे. म्हणून (Hindu religion) हिंदू धर्मात जेव्हा मुलगी जन्माला येते, तेव्हा तिला घरची लक्ष्मी मानले जाते. लोकांनी मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नये, यासाठी समाजात अनेक जनजागृती मोहिमा (Public awareness) राबवल्या जातात. पण आजही आपल्या समाजातून मुलगा-मुलगी असा भेदभाव संपलेला नाही. आजही देशात कुठे ना कुठे मुलींवर रोज अत्याचार होत आहेत. माणुसकीला काळीमा फासणारी अशी भयानक घटना गौतम बुद्ध नगरातून आज उघडकीस आली. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मुलगी झाली म्हणून ठार मारले.
प्रत्यक्षात मुलगी झाल्यामुळे पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. (Police Station) पोलीसांच्या माहितीनुसार, 34 वर्षीय रीना गिरी असे मृत महिलेचे नाव आहे. रीनाचा पती हरेंद्र गिरी याने 13 मे रोजी मुलगी झाल्यामुळे बहिणीच्या डोक्यात वीट मारून तिचा खून केल्याचा आरोप मृताच्या भावाने पोलिसांत केला. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृताचा पती हरेंद्र गिरी याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी येथील छिजरसी गावात भाड्याच्या घरात राहत होता. (humanity disgrace) आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.